तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार! शाळेत जाताना तिघांनी अडवलं अन् नंतर 'त्या' ठिकाणी नेऊन...
9 वीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थीनींना आरोपी तरुणांनी प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि नंतर, त्यांच्यावर बलात्कार केल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार!

शाळेत जाताना तिघांनी अडवलं अन् विद्यार्थीनींसोबत केलं घृणास्पद कृत्य
Rape Case: नुकतीच अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये ही माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे 9 वीत शिकणाऱ्या तीन विद्यार्थीनींना आरोपी तरुणांनी प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि नंतर, त्यांच्यावर बलात्कार केल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी या प्रकरणासंबंधी कारवाई करत तीन तरुणांना अटक केली असून आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना हैदराबादच्या अलवाल परिसरात घडल्याचं समोर आलं आहे. या परिसरात राहणाऱ्या तीन अल्पवयीन पीडित मुली त्यांच्या शालेत आयोजित केलेल्या बतुकम्मा उत्सवात जाण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. दरम्यान, तारनाका परिसरात फिरणाऱ्या या तीन मुलींना आरोपी मधु (19), वामशी (22) आणि नीरज (21) या तीन आरोपींनी प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. आरोपी तिन्ही पीडितांना फूस लावून यदागिरीगुट्टा येथे घेऊन गेले आणि तिथे त्यांनी मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचं सांगितलं जात आहे.
हे ही वाचा: मुंबई: "लहानपणापासूनच टॉर्चर..." संतापलेल्या तरुणाने वडील आणि आजोबांसोबत केलं 'ते' कृत्य अन् काकांना सुद्धा...
कसा झाला घटनेचा खुलासा?
संबंधित घटनेनंतर, पीडित मुली संध्याकाळी तारनाका येथील आपल्या घरी पोहोचल्या आणि त्यावेळी त्यांनी कुटुंबियांना रडत रडत त्यांच्यासोबत घडलेल्या सर्व घटनेबद्दल सांगितलं. घरच्यांना याबद्दल माहिती मिळताच त्यांना मोठा धक्का बसला. यानंतर, पीडित मुलींच्या आई-वडिलांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. दरम्यान, पीडित मुलींना काउन्सलिंगसाठी पाठवण्यात आलं असून प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हे ही वाचा: India Today Conclave Mumbai: 'तो आमचा अतिआत्मविश्वास होता...', CM फडणवीसांनी 'ती' चूक केली मान्य!
पोलिसांचा तपास
मन हेलावून टाकणाऱ्या या घटनेबाबत पोलिसांनी तातडीने कारवाई करत प्रकरणातील आरोपी मधु, वामशी आणि नीरज यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. प्रकरणातील आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांखाली आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आरोपींची चौकशी केली जात असल्याची पोलिसांनी माहिती दिली.