Solapur: हनुवटीवर रायफल ठेवून दाबला ट्रिगर, पोलीस कॉस्टेबलने का केली आत्महत्या?

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

Solapur police constable rahul shirsat shoot himself with rifle shocking crime story solapur news
Solapur police constable rahul shirsat shoot himself with rifle shocking crime story solapur news
social share
google news

Solapur Crime News : सोलापूर (Solapur) शहर पोलीस दलातून खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. या घटनेत एका पोलीस कॉन्स्टेबलने (Police Constable) स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहुल शिरसाट (वय 35) असे आत्महत्या केलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. राहुल यांनी केशव नगर पोलीस वसाहतीत रायफलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी राहुल शिरसाट यांना रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Solapur police constable rahul shirsat shoot himself with rifle shocking crime story solapur news)

राहुल शिरसाट हे पोलीस आयुक्त यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत होते. राहुल शिरसाट यांच्याकडे SLR रायफल होती. ड्युटी संपल्यानंतर राहुल रायफल जमा करायचे. मात्र बुधवारी सकाळी ड्युटी संपल्यानंतर राहुल यांनी रायफल जमा न करता, ते घरी घेऊन गेले. त्यानंतर केशवनगर पोलीस वसाहतीत त्यांनी राहत्या घरी हनुवटीवर रायफल ठेवून ट्रिगर दाबून स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज येताच पोलिसांनी राहुल यांच्या रूमकडे धाव घेतली. यावेळी राहुल शिरसाट हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

हे ही वाचा : Sharad Pawar Ajit Pawar : काका-पुतण्या एका फ्रेममध्ये, दिवाळी पाडव्याच्या रात्री बारामतीत काय घडलं?

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी पोलिसांनी राहुल शिरसाट यांना रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. आता शिरसाट यांचा मृतदेह शविच्छेदनासाठी सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या रिपोर्टमधून मृत्यूचे कारण काय समोर येते हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

राहुल शिरसाट यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप समोर आले नाही आहे. घटनास्थळी देखील कोणतीही सुसाईड नोट सापडली नाही आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या कारणाने राहुल शिरसाट यांनी आत्महत्या केली आहे, हे कळु शकले नाही आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. तसेच राहुल शिरसाट यांच्या आत्महत्येमागचं कारण ही शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

हे ही वाचा : Sushma Andhare : ‘शिवसेनेचं चिलखत…’, संजय राऊतांना अंधारेंचं भावूक पत्र, वाचा जसंच्या तसं

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT