सोनमचं वडिलांच्या फॅक्ट्रीत काम करणाऱ्या मुलाशी सूत जुळलं, तोच 'राजा'च्या खुनातही...

मुंबई तक

सोनमच्या वडिलांची इंदोरमध्ये एक छोटी प्लायवुड फॅक्टरी आहे. याच फॅक्ट्रीत राज कुशवाह काम करायचा. सोनम अनेकदा फॅक्टरीच्या कार्यालयात यायची आणि तिथंच दोघांमध्ये प्रेम झालं.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sonal Raja Honeymoon Case : इंदोरच्या नवविवाहित जोडप्यापैकी राजा रघुवंशी यांच्या खुनाच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम रघुवंशीने तिचा प्रियकर राज कुशवाह आणि भाडोत्री गुंडांसह मिळून पती राजा याच्या खुनाची सुपारी दिली होती. सोनमचा राज कुशवाहसोबत लग्नापूर्वी प्रेमसंबंध होता आणि तोच या खुनाचा मास्टरमाइंड आहे.

सोनमच्या वडिलांची इंदोरमध्ये एक छोटी प्लायवुड फॅक्टरी आहे. याच फॅक्ट्रीत राज कुशवाह काम करायचा. सोनम अनेकदा फॅक्टरीच्या कार्यालयात यायची आणि तिथंच दोघांमध्ये प्रेम झालं. राज कुशवाह सोनमपेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. पोलिसांच्या मते, या प्रेमप्रकरणामुळे सोनमने राजसोबत मिळून राजा याच्या खुनाचा कट रचला.

हे ही वाचा >> दोन लोकल जवळून क्रॉस झाल्या आणि... CSMT-कर्जत लोकलमध्ये काय घडलं, रेल्वेने सविस्तर सांगितलं

इंदोरचे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक राजा रघुवंशी आणि सोनम यांचं 11 मे रोजी थाटामाटात लग्न झालं होतं. लग्नाच्या नऊ दिवसांनंतर, 20 मे रोजी हे जोडपं हनिमूनसाठी मेघालयला रवाना झाले. 22 मे रोजी ते भाड्याच्या स्कूटरने मावलखियाट गावात पोहोचले आणि 3000 पेक्षा जास्त पायऱ्या उतरून नोंग्रियाट गावातील 'लिव्हिंग रूट्स' पूल पाहण्यासाठी गेले. या जोडप्याने नोंग्रियाटच्या शिपारा होमस्टेमध्ये रात्र काढली आणि 23 मे रोजी सकाळी चेकआउट केले. त्यानंतर दोघेही बेपत्ता झाले. 24 मे रोजी त्यांचे स्कूटर शिलॉंग-सोहरा मार्गावरील सोहरारिम येथे एका कॅफेबाहेर बेवारस अवस्थेत सापडले. 2 जून रोजी वेईसावडॉन्ग धबधब्याजवळील एका खोल दरीत राजा यांचा कुजलेला मृतदेह सापडला. त्यानंतर आज 9 जून ला रोजी सोनम गाझीपूर येथे सापडली.

हे ही वाचा >> मुंबईत धावत्या लोकलमधून प्रवासी पडले, 5 जण दगावल्याची माहिती, रेल्वेत काय घडलं?​​​​

शिलाँग पोलीस सोनमला ट्रान्झिट रिमांडवर घेण्यासाठी गाझीपूरला पोहोचत आहेत. पोलीस आता या खुनाच्या कटाची आणि इतर संशयितांच्या भूमिकेची सखोल चौकशी करत आहेत. या प्रकरणातील चौथा आरोपी आनंदला अटक करण्यात आली आहे, तर सोनमला गाझीपूरमधून ताब्यात घेण्यात आले आहे आणि इतर तीन आरोपींना इंदूरमधून पकडण्यात आले आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp