सावत्र वडिलांनी अल्पवयीन मुलीला ठेवलं बंद दाराआड, नंतर कुंटणखाण्यात...
pune crime news : पश्चिम बंगालमध्ये मावशीकडे आलेल्या एका अल्पवयीन मुलीला सावत्र पित्याने एका कुंटणखान्यात विकण्याचा प्रयत्न केला. सावत्र वडिलांच्या अशा अमानवी कृत्याविरोधात मुलीने धाडस दाखवत आपला जीव वाचवला आहे. मुलीचे धाडसीपणामुळे हे प्रकरण आता समोर आले आहे. सहकारनगर पोलिसांनी 39 वर्षीय सावत्र पित्यावर गुन्हा दाखल केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सावत्र पित्याचा एका अल्पवयीन मुलीला कुंटणखान्यात विकण्याचा प्रयत्न

नेमकं घडलं तरी काय?
Pune Crime News : पश्चिम बंगालमध्ये मावशीकडे आलेल्या एका अल्पवयीन मुलीला सावत्र पित्याने एका कुंटणखान्यात विकण्याचा प्रयत्न केला. सावत्र वडिलांच्या अशा अमानवी कृत्याविरोधात मुलीने धाडस दाखवत आपला जीव वाचवला आहे. मुलीचे धाडसीपणामुळे हे प्रकरण आता समोर आले आहे. सहकारनगर पोलिसांनी 39 वर्षीय सावत्र पित्यावर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी माहिती दिली असून पोलीस पुढील तपास करत आहे.
हेही वाचा : मुंबईत धावत्या लोकलमधून प्रवासी पडले, 5 जण दगावल्याची माहिती, रेल्वेत काय घडलं?
मुलीने शक्कल लढवत 'अशी' केली सुटका
पोलिसांनी सांगितले की, मुलगी ही दोन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झालं. त्यानंतर ही मुलगी आपल्या मावशीकडे पश्चिम बंगाल येथील होशियाबादमध्ये वास्तव्यास होती. तर तिची आई ही गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील धनकवडी येथे आपल्या दुसऱ्या पतीसोबत राहत होती. तिच्या पतीचा फळविक्रीचा व्यवसाय होता. पंधरा ते वीस दिवसांआधी तिचे सावत्र वडील मावशीच्या घरी गेले. आपल्या नातेवाईकाचा लग्नसोहळा असल्याचं खोटं कारण सांगत मुलीला जबरदस्ती पुण्यात आणलं. त्यानंतर तिला एका खोलीत डांबलं असून विकण्याचा विचार तिच्या सावत्र वडिलांच्या मनात आला.
खोलीत बंद असणाऱ्या मुलीनं ही माहिती ऐकली आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली. दरम्यान मुलगी ही पश्चिम बंगालमध्ये रहायला असल्याने तिला बंगालीशिवाय इतर कोणतीही भाषा येत नव्हती. मात्र, यावेळी तिने मुंबईत राहणाऱ्या दुसऱ्या मावशीकडे संपर्क साधत आपला जीव वाचवला आहे. मात्र, हा तुमचा घरगुती विषय आहे, मी यात पडणार नसल्याचं सांगत मुंबईच्या मावशीनेही हात वर केले. यामुळे आता पीडित मुलीचा पाय आणखी खोलात गेला.
यानंतर, मुलीच्या मुंबईतील मावशीला या घटनेची जाणीव झाल्यानंतर तिने मुंबईतील स्वयंसेवी संस्थेकडे संपर्क साधत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर संबंधित स्वयंसेवी संस्थेनं त्यांच्या पुण्यातील शाखेशी संपर्क साधला आणि माहिती मिळवली. त्यानंतर त्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मुलीचा मागोवा घेतला. धनकवडी परिसरात त्या मुलीचा सुगावा लागल्यानंतर गुन्हे शाखा आणि सहकारनगर पोलिसांची मदत मागितली आहे.
हेही वाचा : दोन लोकल जवळून क्रॉस झाल्या आणि... CSMT-कर्जत लोकलमध्ये काय घडलं, रेल्वेने सविस्तर सांगितलं
पोलिसांनी वेगाने हलाचाल करुनही तिची सुटका करण्यात आली आणि तिला सुधाहरगृहात पाठवले. तर दुसऱ्या दिवशी तिला बाल न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी तिचे मेडिकल चेकअप करत तिला रिमांडहोममध्ये ठेवण्याचे आदेश देण्यात आले. संबंधित प्रकरणात सावत्र वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.