सोनमनेच केला इंदोरच्या राजाचा दी एंड! 17 दिवसानंतर घरी फोन करुन सगळं सांगितलं, प्रियकरासोबत...
राजा रघुवंशी आणि सोनम यांचा विवाह 11 मे रोजी इंदोरमध्ये हिंदू रीतिरिवाजांनुसार पार पडला. दोघंही 20 मे रोजी हनीमूनसाठी शिलाँगला रवाना झाले.
ADVERTISEMENT

Raja and Sonam Story : अवघ्या 28 दिवसांपूर्वी इंदौरच्या सोनमने राजा रघुवंशीसोबत लग्न केलं होतं. त्यानंतर 20 मे रोजी पतीसोबत ती हनीमूनसाठी शिलाँगला गेली. पण तिथून आलेली बातमी देशभरात खळबळ माजवणारी ठरली. राजाचा मृतदेह एका खोल दरीत सापडला आणि सोनम बेपत्ता झाली. आता 17 दिवसांनंतर या प्रकरणात मोठा ट्विस्ट समोर आला आहे. सोनम जिवंत असून तिला उत्तर प्रदेशच्या गाजीपुरातून पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. चौकशीतून खुलासा झाला की, सोनमचे आधीपासूनच दुसऱ्या तरुणाशी प्रेमसंबंध होते आणि याच कारणास्तव तिने पती राजाच्या हत्येचा कट रचला होता.
हे ही वाचा >> तरूणाने वृद्धाला दगडाने ठेचून संपवलं, रंगेहाथ पकडल्यावर आरोपीच्या डोक्यात दगड...
11 मे लग्न, 20 मे पासून हनीमून आणि 23 ला दी एंड एंड
राजा रघुवंशी आणि सोनम यांचा विवाह 11 मे रोजी इंदोरमध्ये हिंदू रीतिरिवाजांनुसार पार पडला. दोघंही 20 मे रोजी हनीमूनसाठी शिलाँगला रवाना झाले. 22 मे रोजी ते नोंग्रियाट गावातील शिपारा होमस्टेमध्ये थांबले. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता त्यांनी चेकआउट केलं आणि त्यांचे मोबाइल बंद झाले. 24 मे रोजी मवालखियतपासून 25 किमी अंतरावर ओसरा हिल्सच्या पार्किंगमध्ये त्यांची स्कूटी लावारिस अवस्थेत सापडली. त्यानंतर जंगलात त्यांचं सामान आढळलं आणि 2 जून रोजी वेईसावडॉन्ग धबधब्याजवळ खोल दरीत राजाचा मृतदेह सापडला. त्याच्या हातावरील टॅटूमुळे त्याची ओळख पटली.
17 दिवसांनंतर सोनमने स्वतः केला फोन
9 जूनच्या पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमारास सोनम गाजीपुरच्या नंदगंज परिसरातील एका ढाब्यावर पोहोचली. तिथून तिने ढाबा चालकाचा फोन घेऊन आपल्या भावाला व्हिडिओ कॉल केला आणि सांगितलं की ती गाजीपुरात आहे. भावाने तात्काळ इंदोर पोलिसांना माहिती दिली. इंदोर पोलिसांनी गाजीपुर पोलिसांशी संपर्क साधला आणि सोनमला ताब्यात घेण्यात आलं. तिची वैद्यकीय तपासणी वन स्टॉप सेंटरमध्ये करण्यात आली. तिच्या अंगावर कोणत्याही जखमांचे किंवा मारहाणीचे निशाण आढळले नाही.
हे ही वाचा >> आधी पत्नीला गोळी घातली, नंतर स्वत:ला गोळी झाडून संपवलं; मुलगा, सुनेला वेगळं राहण्यावरुन...
मिळालेल्या माहितीनुसार सोनमचा एका तरुणाशी लग्नाच्या आधीपासून प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही ते संपर्कात होते. सोनमने आपल्या प्रियकराच्या मदतीने राजाला मार्गातून हटवण्याचा कट रचला. शिलाँगमध्ये हत्या करण्यात आली. या प्रकरणात एकूण चार जणांचा सहभाग असून, त्यापैकी तीन जणांना इंदौरमधून अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी उत्तर प्रदेशातील असून तो फरार आहे.
सीसीटीव्ही फुटेज आणि ऑडियो कॉलमुळे बिंग फुटलं
22 मे रोजी शिलाँगमधील एका हॉटेलबाहेरील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. यामध्ये सोनम आणि राजा स्कूटीवर येताना आणि बॅग ठेवताना दिसत आहेत. हीच ती स्कूटी आहे जी नंतर सापडली होती. याशिवाय, 23 मे रोजी दुपारी दीड वाजता सोनमने राजाची आई उमा देवी यांच्याशी शेवटचा संपर्क साधला. या कॉलमध्ये ती म्हणाली, “मम्मी, हे मला जंगलात फिरवत आहेत, धबधबा पाहायला आलो आहोत…” यानंतर अर्ध्या तासाने तिचा फोन बंद झाला. कॉलमध्ये सोनमने उपवास, खाण्याच्या तक्रारी आणि दम लागतोय वगैरे वगैरे गोष्टी अत्यंत निरागसपणे सांगितलं होतं. अगदी काहीच घडलं नसल्याचं दाखवण्याचा प्रयत्न तिने केला होता. पण आता तीच सोनम हत्येची आरोपी आहे.
सोनमची आई काय म्हणाली?
सोनमची आई संगीता यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं, “आभार मानते की माझी मुलगी सापडली. पण हेही दुखः आहे आणि तेही दुखः आहे. आता राजाच्या खुन्यांचा शोध लागणं बाकी आहे. काय खरं आणि काय खोटं, हे तपासातूनच कळेल. मी काय सांगावं? मुलगी सापडली, पण खरं काय आहे? पुढच्या सगळ्या गोष्टींना आम्हालाच सामोरं जावं लागेल.”
मेघालय पोलिसांची पुष्टी
दरम्यान, सध्या इंदौर आणि शिलाँग पोलीस गाजीपुरला पोहोचले असून, सोनमची चौकशी सुरू आहे. मेघालयचे डीजीपी एल. नोंग्रांग यांनी पुष्टी केली की, इंदौरचा रहिवासी राजा रघुवंशी याच्या हत्येप्रकरणी त्याची पत्नी सोनमसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. गाजीपुरातून ताब्यात घेतलेल्या सोनमची चौकशी सुरू आहे.