Thane Jail : कैद्याची एक चप्पल जड आणि एक हलकी वाटली...अधिकाऱ्यांनी तपास केला असता ठाणे कारागृहात काय सापडलं?
30 डिसेंबर 2024 रोजी तुरुंगातील हवालदार बॅरेक क्रमांकाची तपासणी करत असताना ही बाब उघडकीस आली. ठाणे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल बोलताना सांगितलं की, कारागृहातील तीन नवीन विभागातील 200 कैद्यांची तपासणी सुरू आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
ठाणे कारागृहात खळबळजनक घटना
कैद्याच्या चप्पलमध्ये आढळला मोबाईल
कैद्यानं कसा लपवला होता मोबाईल?
ठाणे मध्यवर्ती कारागृहात एका कैद्यानं केलेला प्रताप उघड झाला आहे. या घटनेमुळे जेल प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.पोलिसांनी गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार एका अंडरट्रायल कैद्याकडून एक मोबाइल जप्त करण्यात आला आहे. आपल्या चप्पलमध्ये या कैद्यानं फोन लपवला होता असं समोर आलं आहे.
30 डिसेंबर 2024 रोजी तुरुंगातील हवालदार बॅरेक क्रमांकाची तपासणी करत असताना ही बाब उघडकीस आली. ठाणे पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी याबद्दल बोलताना सांगितलं की, कारागृहातील तीन नवीन विभागातील 200 कैद्यांची तपासणी सुरू आहे.
कैदी हेमंत पारसमल सेठिया (38) याची एक चप्पल जमिनीवर पडलेली आढळली, तर त्याची दुसरी चप्पल गायब होती. अधिकाऱ्यांनी झडती घेतल्यानंतर दुसरी चप्पल बॅरेकमध्येच दुसऱ्या ठिकाणी सापडली. पण अधिकाऱ्यांनी जेव्हा दोन्ही चप्पल हातात घेतल्या तेव्हा एक जड आणि एक हलकी वाटली. त्यामुळे अधिकाऱ्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.