एकाच वेळी सुरू होतं तीन मुलींसोबत गॅटमॅट, बॉयफ्रेंडची एक चूक अन्…

मुंबई तक

ADVERTISEMENT

three women had same boyfriend and money fraud lakh of rupees police complaint file and accused arrested chin
three women had same boyfriend and money fraud lakh of rupees police complaint file and accused arrested chin
social share
google news

प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असत, असे म्हटले जाते. मात्र प्रत्येकवेळी ते सेम असेल असे सांगता येत नाही. आता अशीच सेम नसलेली घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरूण एकाच वेळेस तीन तरूणींना डेट करत असल्याची घटना समोर आली आहे. नात्यात असताना आरोपी तरूणींकडून पैसै घेऊन त्यांची लुटमार करायचा. यानंतर तरूणींशी ब्रेकअप करून दुसऱ्या तरूणींना आपल्या प्रेमाचा जाळ्यात फासायचा, असा सर्व खेळ आरोपी तरूणीचा सुरु होता. मात्र तीनही गर्लफ्रेंडला (Girl Friend) या घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोपी बॉयफ्रेंडला (Boy Friend) चांगलाच धडा शिकवला आहे. नेमका हा घटनाक्रम काय आहे? हे जाणून घेऊया. (three women had same boyfriend and money fraud lakh of rupees police complaint file and accused arrested)

तरूणीची पोलिसात एकत्र तक्रार

साऊथ चायना मॉर्निग पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, 10 फेब्रुवारीला तीन तरूणी शंघाईच्या यांगपू जिल्ह्यातील पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या होत्या.या तरूणींनी एकत्र मिळून शीवई नावाच्या एका व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती.या तक्रारीत तरूणींनी आरोप केला की, या तरूणाने आमच्याकडून पैसै घेऊन ते परत न केल्याचा आरोप केला होता. विशेष म्हणजे या तरूणींची भेट शीवई विरोधात तक्रार दाखल करण्याच्या एक दिवस आधीच झाली होती.

हे ही वाचा : चार मुलांच्या आईवर शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून पाशवी बलात्कार

असा झाला भांडाफोड

शाम शीवई हा तरूण 9 फेब्रुवारीला संध्याकाळी चेन होंग नाम सोबत डिनरवर गेला होता. यावेळेस त्याने खुपच जास्त दारू प्यायली होती. ही दारू प्यायल्यानंतर तो चेनच्या घरी जाऊन झोपला होता. चेन होंगला आधीच शीवईवर संशय होता. त्यामुळे शीवई दारूच्या नशेत असताना चेन होंगने त्याचा मोबाईल तपासण्याचा निर्णय़ घेतला. यावेळी मोबाईल तपासताना तिलाच मोठा धक्का बसला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शीवईच्या फोनवर अनेक महिलांचे मॅसेज आले होते. यामधील एका मेसेजमध्ये महिलेने लिहले की, तु माझा फोन का नाही उचलत आहेस? चेनने हा मेसेज पाहताच त्या महिलेला फोन लावून विचारपूस केली.य़ावेळी शियाओ फान या महिलेने तिला ती शीवईसोबत राहत असल्याची माहिती दिली.तसेच तो अनेकदा तिच्या फ्लॅटवर येऊन झोपायचा. शियाओ सांगत असलेले सर्व कहानी एकूण चेनला मोठा धक्काच बसला होता. तसेच चेन आणि शिय़ाओला शीवई दोघांसोबत लग्न करणार असल्याची माहिती मिळाली होती.

दुसऱ्या दिवशी पहाटे चेनला आणखीण एका महिलेचा फोन आला होता. या महिलेचे नाव झाओ लिन होते. झाओने देखील ती शीवईची गर्लफ्रेंड असल्याचा धक्कादायक खुलासा केला होता. झाओचा चुलत भाऊ आणि चेन मित्र आहेत. त्यामुळे झाओला चेनचा नंबर मिळाला होता. त्यामुळे या सर्व खुलास्यानंतर चैनला शीवई तरूणींना प्रेमाच्या जाळ्यात फासून लुटत असल्याचा सर्व प्रकार कळून आला होता.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : मेलेल्या आईच्या टाळूवरचा लोणी खाणारा मुलगा, 6 वर्ष राहिला ‘तिच्या’ मृतदेहासोबत अन्…

दरम्यान सकाळी 10 फेब्रुवारीला जेव्हा शीवई उठला त्यावेळेस चेनने त्याची टेर खेचत पैशांची मागणी केली.मात्र त्याने पैसे देण्यास नकार दर्शवला. यानंतर काही तासांनी तीनही तरूणींनी एकत्र पोलीस स्टेशनला भेट दिली आणि तक्रार दाखल केली. या तक्रारीत पोलिसांना स्पष्ट झाले होते की, आरोपी तरूण तिघांचा बॉयफ्रेंड होता. शीवईने 2021 ला झाओ, जून 2022 ला शियाओ आणि ऑक्टोबर 2022 ला चेनला डेट करायचा. आरोपीने झाओला 1.40 लाख, चेनला 4.54 लाख आणि शियाओला 5.11 लाखाला लुटले आहे. या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन वर्ष सहा महिन्याची शिक्षा सुनावली. चीनच्या शंघाईत ही घटना घडलीय.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT