Mumbai :आर्थर रोड जेल हादरला! दोन कैद्यांकडून एकावर अनैसर्गिक अत्याचार
आर्थर रोड तुरुंगात दोन कैद्यांनी एका कैद्याला अडवून अनैसर्गिक अत्याचार केले, तसेच नंतर मारहाणही केली.
ADVERTISEMENT
Arthur Road Jail Latest News : मुंबईतील आर्थर रोड तुरुंगातच कैद्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन कैद्यांनी एका कैद्याला अडवून अत्याचार केले, तसेच नंतर मारहाणही केली. रविवारी ही घटना उजेडात आली. पीडित कैद्याने तक्रार दिल्यानंतर ना.म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
समीर शेख उर्फ पुडी (वय 23) आणि राशीद फराज (वय 36) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा >> देवेंद्र फडणवीसांचं टेन्शन वाढवणाऱ्या ‘त्या’ सर्व्हेमध्ये नेमकं काय?
मिळालेल्या माहितीनुसार पुडी अर्थात समीर शेख आणि फराज यांना अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यातंर्गत अटक करण्यात आलेली आहे. दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली असून, त्यांना आर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आलेले आहे.
हे वाचलं का?
दोन्ही आरोपींनी नेमकं काय केलं?
पीडित 23 वर्षीय कैद्याने दिलेल्या तक्रारीनुसार 7 जून रोजी पुडी आणि फराजने त्याला बाथरुममध्ये अडवले. त्यानंतर दोघांनी त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचारानंतर 9 जून रोजी आरोपींनी त्याला शिवीगाळही केली.
हेही वाचा >> “राष्ट्रामध्ये मोदी, महाराष्ट्रात शिंदे”, देवेंद्र फडणवीसांना इशारा?
दिलेल्या तक्रारीनुसार पुडी नावाच्या आरोपीने पीडित कैद्याला मारहाणही केली. 23 वर्षीय कैद्याला मारहाण करण्यात आल्याची माहिती तुरुंग अधीक्षकांना मिळाली. त्यानंतर त्यांनी त्या तरुणाची चौकशी केली.
ADVERTISEMENT
दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा दाखल…
तुरुंग अधीक्षकांनी चौकशी केल्यानंतर तरुणाने सुरुवातीला काहीच सांगितले नाही. नंतर त्याने झालेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. रविवारी पीडित कैद्याच्या तक्रारीवरून ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार, शांतता भंग करणे, धमकावणे, मारहाण तसेच संगनमत करून अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT