फ्लॅटमध्ये पहाटे-पहाटे रंगला रक्तरंजित खेळ! जुळ्या मुलींसोबत बापाने काय केले? पोलिसांच्याही काळजाचा ठोका चुकला
बापाने आपल्या जुळ्या मुलींची हत्या केली आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले. त्याठिकाणाचे दृश्य पाहून त्यांच्याही काळजाचा ठोका चुकला.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
फ्लॅटमध्ये पहाटे-पहाटे रंगला रक्तरंजित खेळ!
जुळ्या मुलींसोबत बापाने काय केले?
पोलिसांच्याही काळजाचा ठोका चुकला
Crime News : माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत थरारक घटना समोर आली आहे. रविवारी पहाटे जेव्हा संपूर्ण परिसर गाढ झोपेत होता, तेव्हा 'त्रिमूर्ती अपार्टमेंट'मधील एका घरात रक्तरंजित खेळ रंगला. एका निर्दयी बापाने आपल्याच दोन अल्पवयीन जुळ्या मुलींची गळा चिरून निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, ज्या बापाने सांभाळ करायचा त्यानेच मुलींचा जीव घेतल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमधील ही घटना आहे.
पोलिसांच्याही काळजाचा ठोका चुकला
रविवारी (19 एप्रिल) पहाटे 4:30 वाजता यूपी पोलिसांच्या हेल्पलाईनवर एका अनामिक फोनने पोलिसांची झोप उडवली. त्रिमूर्ती अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये दोन मुलींची हत्या झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घराचे दार उघडताच पोलिसांच्याही काळजाचा ठोका चुकल. रक्ताच्या थारोळ्यात 11 वर्षांच्या त्या दोन निष्पाप जुळ्या बहिणींचे मृतदेह पडलेले होते. त्यांचा गळा धारदार शस्त्राने अत्यंत क्रूरपणे चिरण्यात आला होता. घटनास्थळावरील तो भीषण देखावा पाहून पोलीस अधिकारीही काही काळ सुन्न झाले.
हे ही वाचा : ठाणे : मोहम्मद शेजाऱ्याच्या घरात वाकून बघायचा, अन् तरुणीला त्रास द्यायचा, शेवटी काय घडलं?
आरोपी बाप ताब्यात
घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह फॉरेन्सिक टीमला तातडीने पाचारण करण्यात आले. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घरातून पुरावे गोळा केले असून हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस उपायुक्त दीपेंद्र नाथ चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बापाला पोलिसांनी तत्परतेने बेड्या ठोकल्या आहेत. प्राथमिक चौकशीत त्याने गुन्हा कबूल केला असला, तरी एका बापाने आपल्याच काळजाच्या तुकड्यांना संपवण्याइतपत टोकाचे पाऊल का उचलले, याचे गूढ अद्याप कायम आहे. पोलीस या प्रकरणाचा विविध बाजूंनी तपास करत आहेत.
हे ही वाचा : अक्षय्य तृतीयेला घरी आणा 'ही' वस्तू, कुटुंबाची होईल भरभराट, कधीच कमी पडणार नाही पैसा..
सर्वत्र भयाण शांतता
या भयानक कृत्यानंतर संपूर्ण अपार्टमेंटमध्ये भयाण शांतता पसरली असून नागरिक हादरून गेले आहेत. पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह पोस्ट मार्टमसाठी पाठवले असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आरोपीला न्यायालयात हजर केले जाणार आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहेत, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे. सध्या घटनास्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, या दुर्दैवी घटनेने समाजातील वाढत्या हिंसेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.









