Crime : विवाहित प्रियकराचा ‘त्या’ गोष्टीला नकार, संतापलेल्या प्रेयसीने कापला प्रायव्हेट पार्ट
विवाहित पुरुष गंभीर अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल झाला होता. या रूग्णालयातून त्याला मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले होते. या घटनेत त्याची प्रकृती खूपच गंभीर आहे.
ADVERTISEMENT
Crime news : देशभरात अनैंतिक संबंधाच्या घटना वाढत चालल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे गुन्ह्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. अशीच एक अनैतिक संबंधाची घटना समोर आली आहे. या घटनेत एका विवाहित पुरूषाचे तरूणीसोबत अनैतिक संबंध होते. या अनैतिक नात्यात असताना कोणत्या तरी कारणावरुन दोघांमध्ये वाद झाले होते. या वादातून प्रेयसीने थेट विवाहित प्रियकराचा (Married Husband) प्रायव्हेट पार्टच (Private Part) कापल्याची घटना घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे. (uttar pradesh crime story girlfried along with friend cut off married boyfriend private part shocking crime story)
ADVERTISEMENT
उत्तरप्रदेशच्या ललितपूरमध्ये ही घटना घडली आहे. नाराहट ठाणे क्षेत्रातील अर्जुन खिरीया गावात हा विवाहित पुरुष राहायचा. हा व्यक्ती राजस्थानमध्ये मजूरीचे काम करायचा. विवाहित पुरूषाचे ललितपूरच्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात दोघांनी पुढे जाऊन राजस्थानमध्ये एकत्र राहण्याचा निर्णय़ घेतला होता.
हे ही वाचा : Prakash Ambekar : “निर्णय देणार नाही, असं नार्वेकरांनी सुप्रीम कोर्टाला आव्हान द्यावं”
या दरम्यान घटनेच्या दिवशी विवाहित पुरुष घरी आला असता प्रेयसीने त्याच्यावर लग्नाचा दबाव टाकला होता. मात्र पुरुष आधीच विवाहित असल्याने त्याने महिलेला नकार दिला होता. विवाहित प्रियकराच्या या नकाराने प्रेयसी चांगलीच संतापली. यानंतर तिने तिच्या मित्रांना बोलावून विवाहित प्रियकराचा प्रायव्हेट पार्टच कापला होता. या घटनेनंतर प्रेयसी आणि तिचे मित्र फरार झाले होते.
हे वाचलं का?
या घटनेनंतर विवाहित पुरुष गंभीर अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल झाला होता. या रूग्णालयातून त्याला मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले होते. या घटनेत त्याची प्रकृती खूपच गंभीर आहे. या प्रकरणी विवाहित प्रियकराने महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर आरोपी प्रेयसी आणि तिच्या साथिदारांचा शोध सुरु केला आहे.
हे ही वाचा : Sharad Mohol : मोहोळ हत्याकांडाचं ‘मुळशी’ कनेक्शन आलं समोर; ‘या’ टोळीवर संशय
पीडित पुरुषाच्या कुटुबियांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत महिलेने पीडित पुरूषाचे प्रायव्हेट पार्ट कापल्याची माहिती दिली. या प्रकरणी आरोपी प्रेयसीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपी प्रेयसी आणि तिच्या साथिदाराचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत, असी माहिती पोलीस अधिकारी आरपी सिंह यांनी दिली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT