शीर तलावात अन् धड रेल्वेत, बापाला आवडला नाही मुलीचा 'तो' निर्णय, अखेर..

मुंबई तक

काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या स्लीपर कोचमध्ये आढळलेल्या शिर नसलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. ही घटना 'ऑनर किलिंग'मुळे झाली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

ADVERTISEMENT

Crime News
Crime News
google news

बातम्या हायलाइट

point

शीर तलावात अन् धड रेल्वेत,

point

बापाला आवडला नाही मुलीचा 'तो' निर्णय

Crime News : नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या स्लीपर कोचमध्ये आढळलेल्या शिर नसलेल्या मृतदेहाचे गूढ अखेर उकलले आहे. ही घटना 'ऑनर किलिंग'मुळे झाली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. गोमती एक्सप्रेसमध्ये एका 16 वर्षांच्या मुलीचा मृतदेह सापडला होता. यानंतर झालेल्या तपासात तिची हत्या तिच्या वडिलांनीच केल्याचे स्पष्ट झाले. यापूर्वी दोन मोठ्या मुलींनी प्रेमविवाह केल्यामुळे संतप्त झालेल्या बापाला तिसऱ्या मुलीचे प्रेमसंबंध मान्य नव्हते, याच रागातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.

बहिणीच्या मदतीने रचला कट

बिग्गन अन्सारी असं आरोपी बापाचं नाव आहे. तो उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील रहिवासी असून तो ई-रिक्षा चालक आहे. त्याला एकूण तीन मुली. पैकी दोन मोठ्या मुलींनी प्रेमविवाह केल्यामुळे बिग्गन नाराज होता. अशातच त्याची तिसरी 16 वर्षांची मुलगी एका तरुणाच्या संपर्कात असल्याचे त्याला समजले. तिला अनेकदा समजावूनही तिने ऐकले नाही, तेव्हा बिग्गनने तिला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने थंड डोक्याने कट रचला. 16 मे रोजी त्याने आपली पत्नी आणि दोन्ही मुलांना नातेवाइकांकडे पाठवून दिले आणि घरी केवळ वृद्ध आई व लहान मुलगी असताना आपल्या बहिणीला व मेव्हण्याला मदतीसाठी बोलावून घेतले.

हे ही वाचा : बीड : मित्रांनीच पाठीत खंजीर खुपसला, हॉटेल चालक कारभारी सोबत काय घडलं?

शीर तलावात अन् धड रेल्वेत

बिग्गन, त्याची बहीण नूरजहाँ आणि मेव्हणा मजबुल्लाह या तिघांनी मिळून धारदार शस्त्राने मुलीची गळा चिरून हत्या केली. यानंतर त्यांनी मृतदेहाचे अनेक तुकडे केले. मुलीचे शीर गावातीलच एका तलावात फेकून दिले, तर धड कपड्यात आणि प्लास्टिकमध्ये गुंडाळून एका मोठ्या पेटीत बंद केले. यानंतर रात्रीच ती पेटी रिक्षातून नेली आणि छपरा-गोमतीनगर एक्स्प्रेसच्या 'S-1' स्लीपर कोचमध्ये ती पेटी ठेवून तिघेही पसार झाले.

हे ही वाचा : उल्हासनगर : भररस्त्यात थरारक गोळीबार, सात राऊंड फायर; किती जणांचा गेला जीव?

सीसीटीव्ही फुटेजमुळे आरोपी गजाआड

ट्रेन गोमतीनगर स्थानकावर पोहोचल्यानंतर कोचमध्ये बेवारस पेटी आढळल्याने एकच खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांनी तत्परता दाखवत गोमतीनगर ते छपरा दरम्यानच्या सर्व स्थानकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. एका कॅमेऱ्यात बिग्गन आणि त्याचे साथीदार संशयास्पद रित्या पेटी घेऊन जाताना कैद झाले. या फुटेजच्या आधारे कुशीनगर स्वात टीम आणि आरपीएफने बिग्गनला ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने घडलेला प्रकार सांगितला. बिग्गनने दिलेल्या माहितीवरुन तलावातून मुलीचे कापलेले शीर आणि हत्येसाठी वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले असून, चारबाग जीआरपी पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
 

हे वाचलं का?