गरोदर पत्नीच्या देखरेखेसाठी जवळच्या व्यक्तीला ठेवलं, पण त्याच्यासोबत अफेअर, मर्डरने एन्ड
visakhapatnam crime news : विशाखापट्टणममध्ये विवाहित चालकाने लग्नासाठी दबाव टाकणाऱ्या प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून ओडिशात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
गरोदर पत्नीच्या देखरेखेसाठी जवळच्या व्यक्तीला ठेवलं
पण त्याच्यासोबत अफेअर, मर्डरने एन्ड
visakhapatnam crime news :आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममधून अत्यंत धक्कादायक हत्या प्रकरण समोर आले आहे. विशाखापट्टणमच्या कंचारपालम येथील दुर्गा नगरमध्ये राहणाऱ्या एका कारचालकाने आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने आरोपीने महिलेचा मृतदेह एका मोठ्या सुटकेसमध्ये भरला. त्यानंतर कोणाचाही संशय येऊ नये म्हणून तो सुटकेस रेल्वेने शेजारील ओडिशात घेऊन गेला आणि रायगडा जिल्ह्यातील निर्जन भागात फेकून दिला. या प्रकरणाचा तपास करत पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य आरोपीला अटक केली आहे.
हेही वाचा : 'तुम्ही कधीही चुकणार नाही, ही माझी गॅरंटी...' अमित शहांचा देशातील तरुणांना सल्ला, नेमकं काय म्हणाले?
लग्न करण्यासाठी सातत्याने दबाव टाकल्याने महिलेचा मर्डर
या घटनेची सुरुवात कंचारपालम येथील दुर्गा नगर परिसरातून झाली. बोलिसेट्टी सुरेश हा व्यवसायाने कारचालक असून त्याची पत्नी गर्भवती होती. पत्नीची देखभाल आणि घरातील कामांसाठी त्याने परिचयातील एका तरुणीला घरी बोलावले होते. एकाच घरात राहत असताना सुरेश आणि त्या तरुणीमध्ये जवळीक निर्माण झाली आणि त्यांच्यात अनैतिक संबंध प्रस्थापित झाले. काही काळानंतर आरोपीची गर्भवती पत्नी माहेरी गेली. त्याच दरम्यान संबंधित तरुणीने सुरेशवर लग्न करण्यासाठी सातत्याने दबाव टाकण्यास सुरुवात केली. याच कारणावरून दोघांमध्ये तीव्र वाद झाला. वादाच्या भरात सुरेशने तरुणीला जोरात भिंतीवर आपटले, तिच्यावर मारहाण केली आणि तिची हत्या केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा : मोदींचं कौतुक करणारे विवेक ओबेरॉय अन् आर माधवन राहायला दुबईत, राज ठाकरेंनी सगळंच काढलं
