नागपूर पवनकर हत्याकांड:एकाच कुटुंबातील 5 सदस्यांच्या हत्येप्रकरणी आरोपीला फाशी

योगेश पांडे

ADVERTISEMENT

vivek palatkar sentenced to death in pawankar murder case in nagpur
vivek palatkar sentenced to death in pawankar murder case in nagpur
social share
google news

Vivek Palatkar sentenced to death in Pawankar murder case : योगेश पांडे : आपल्याच बहिणीच्या कुटुंबातील पाच सदस्यांची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी विवेक पालटकरला (vivek palatkar) जिल्हा व सत्र न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2018 साली म्हणजेच पाच वर्षापूर्वी हे हत्याकांड घडलं होते.या घटनेने उपराजधानी हादरली होती. (vivek palatkar sentenced to death in pawankar murder case in nagpur)

ADVERTISEMENT

नेमकं प्रकरण काय?

नागपूर शहरातील खरबी जवळच्या आराधना नगर भागात १० जून २०१८ रोजी हत्याकांड घडले होते. आरोपी विवेक पालटकरने (vivek palatkar) बहीण अर्चना पवनकर,जावई कमलाकर पवनकर, मीराबाई पवनकर, वेदांती आणि भाचा कृष्णा यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे 2016 ला विवेक पालटकरने त्याच्या पत्नीची सुद्धा हत्या केली होती. संपत्तीच्या वादातून आरोपी विवेक पालटकरने (vivek palatkar) बहीण-जावयाचे संपूर्ण कुटुंब एकाच रात्री संपवले होते.

हे ही वाचा : गँगस्टर अतिक- असदच्या कथेत अंडरवर्ल्ड डॉनची एंट्री; कोण आहे अबू सालेम?

कमलाकर पवनकर (Kamlakar Pawankar) भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. कमलाकर यांचा मेहुणा आरोपी विवेक पालटकर (vivek palatkar)नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यात राहत होता. या घटेनच्या दोन वर्षांपूर्वी आरोपीने स्वत:च्या पत्नीची हत्या केली होती. या हत्येप्रकरणी विवेक पालटकर तुरुंगात होता. त्यावेळी कमलाकर पवनकर यांनीच त्याला जेलमधून बाहेर येण्यासाठी पैशाची मदत केली होती.

हे वाचलं का?

आरोपीने असा रचला कट

विवेक(vivek palatkar) तुरुंगाबाहेर आल्यानंतर संपत्तीच्या कारणावरून कमलाकर पवनकर यांच्यात वाद सुरू झाला होता. हळूहळू हा वाद वाढत गेल्याने संतापलेल्या विवेक पालटकरने 10 जून 2018 च्या रात्री हत्येचा कट रचला. मध्यरात्री झोपेत असलेल्या कमलाकर पवनकर यांच्यावर हल्ला करून हत्या केली. त्याचवेळी त्याने बहिण अर्चना पवनकर, आई मीराबाई पवनकर, भाची वेदांती आणि मुलगा कृष्णाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या घटनेनंतर राजधानी हादलेली.

‘त्या’ दोघी थोडक्यात बचावल्या

हत्याकांडाच्या दिवशी कमलाकर पवनकर यांच्या घरात एकूण सात सदस्य होते. त्यातील पाच सदस्य एका खोलीत तर दोन मुली दुसऱ्या खोलीत झोपल्या होत्या. त्यामुळे त्या थोडक्यात बचावल्या. यामधील एक मुलगी ही आरोपी विवेक पालटकर आणि दुसरी मुलगी ही कमलाकर पवनकर यांची होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Instagram वर मैत्री, 5 वर्ष शारीरिक संबंध अन् अचानक पाठवले मोबाइलवर ‘ते’ Video…

पाच वर्षे कोर्टात केस चालली

तब्बल पाच वर्षे न्यायालयात खटला चालल्यानंतर 3 एप्रिलला जिल्हा सत्र न्यायालयाने विवेकला (vivek palatkar) दोषी ठरवले होते. सर्व साक्षी पुरावे आरोपी विवेकने केलेल्या निर्घृण कृत्याची साक्ष देत असल्याने आज अखेर त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली. आरोपीने केलेला गुन्हा रेअर ऑफ रेअरेस्ट गुन्ह्यांच्या प्रकारात मोडतो, त्यामुळे आरोपीला कोणत्याही प्रकारची दया दाखविली जाऊ शकत नाही अशी टिप्पणी न्यायालयाने केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT