‘मेन बात ये है कि गुड्डू मुस्लिम…’ अतिकचे शेवटचे शब्द अन् थेट डोक्यात गोळी…

मुंबई तक

ADVERTISEMENT

what were atiq ahmeds last words before losing his life atiq and his brother ashraf ahmed shot dead
what were atiq ahmeds last words before losing his life atiq and his brother ashraf ahmed shot dead
social share
google news

प्रयागराज: उमेश पाल (Umesh Pal) खून प्रकरणातील आरोपी माफिया अतिक अहमद (atiq ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. प्रयागराज येथील मेडिकल कॉलेजजवळ तीन हल्लेखोरांनी दोघांची हत्या केली. हल्ला करणाऱ्या तिघांनी जय श्री रामचा नारा देत गोळीबार केल्याचे सांगण्यात येत आहे. आता घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण प्रयागराजचं जणू काही छावणीत रुपांतर झाले आहे. (what were atiq ahmeds last words before losing his life atiq and his brother ashraf ahmed shot dead)

ADVERTISEMENT

पोलिसांच्या गराड्यात घुसून हल्लेखोरांचा गोळीबार

दोन्ही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पोलीस वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले होते. दरम्यान, पोलीस बंदोबस्तात घुसून हल्लेखोरांनी अनेक राऊंड गोळीबार केला. अंदाधुंद गोळीबारामुळे पोलिसांमध्येही एकच गोंधळ उडाला. अनेक गोळ्या लागल्याने अतिक आणि अशरफ हे जागीच मृत्यूमुखी पडले.

अधिक वाचा- मोठी बातमी: पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या अतिक-अशरफची गोळ्या झाडून हत्या, घटना कॅमेऱ्यात कैद

अतिकचे शेवटचे शब्द…

अतिकचा भाऊ अश्रफ मीडियाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी पुढे आला तेव्हा हा हल्ला झाला. तेव्हा अतिकचे शेवटचे शब्द हे होते की, ‘मुख्य गोष्ट ही आहे की, गुड्डू मुस्लिम…’, हे एवढेच शब्द अतिक बोलला आणि त्यानंतर हल्लेखोरांपैकी एकाने अतिकच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडली. एवढेच नाही तर त्याच्या अन्य दोन साथीदारांनी दोघांनाही लक्ष्य करून अनेक राऊंड फायर केले.

हे वाचलं का?

अधिक वाचा- ‘माझं कुटुंब उद्ध्वस्त झालं’, कुख्यात माफिया अतिक अहमद असं का म्हणाला?

यानंतर आरोपींनी आपल्या हातातील बंदुका टाकून थेट पोलिसांसमोर हात उंचावून आत्मसमर्पणही केले. पोलिसांनी हल्लेखोरांना पकडले आहे. लवलेश तिवारी, सनी आणि अरुण मौर्य अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून पिस्तूल जप्त केले आहे.

या हल्ल्यात एका पोलीस कर्मचाऱ्यालाही गोळी लागली असून, मान सिंह असे त्याचे नाव आहे. तर दुसरीकडे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दोन्ही आरोपींची अशा प्रकारे हत्या कशी करण्यात आली? यावरून आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

ADVERTISEMENT

अधिक वाचा- बॉयफ्रेंडला घरी बोलावून सासू-सासऱ्यांची हत्या,पोलिसांनी असा लावला गुन्ह्याचा छडा

या खळबळजनक घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. प्रयागराजपासून राज्याच्या राजधानीपर्यंत गोंधळाचे वातावरण आहे. हल्लेखोरांनी ज्या पद्धतीने ही घटना घडवून आत्मसमर्पण केले, त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलिसांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेण्यासाठी आले आहेत. येथे उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. यामध्ये डीजीपी आणि एडीजीही उपस्थित आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT