Sharad Mohol चा एका झटक्यात ‘गेम’ करणारा विठ्ठल शेलार आहे तरी कोण?

राहुल गायकवाड

ADVERTISEMENT

who is vitthal shelar the notorious goon who is the mastermind behind the sharad mohol murder case
who is vitthal shelar the notorious goon who is the mastermind behind the sharad mohol murder case
social share
google news

Sharad Mohol Murder Case: पुणे: पुण्यातील गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) याच्या हत्येनंतर आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत. मोहोळच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली होती. आता या खुनामध्ये गुंड विठ्ठल शेलार (Vitthal Shelar) आणि रामदास मारणेसह (Ramdas Marne) 10 आरोपींना अटक करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आलं आहे. पनवेल पोलिसांनी पनवेल येथील एका फार्म हाऊसवर कारवाई करत आरोपींना अटक करुन पुणे पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे. (who is vitthal shelar the notorious goon who is the mastermind behind the sharad mohol murder case)

ADVERTISEMENT

पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळच्या हत्येचा कट रचणारा कोण आहे विठ्ठल शेलार हे आपण जाणून घेऊया सविस्तर.

कोण आहे विठ्ठल शेलार?

काही दिवसांपूर्वी पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची त्याच्या राहत्या घराजवळ हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी मोहोळवर गोळ्या झाडून त्याची हत्या केली होती. मोहोळच्या गँगमध्येच असलेल्या मुन्ना पोळेकर आणि त्याच्या साथिदारांनी मोहोळचा खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आलं होतं. आता या हत्याकांडामध्ये नवनवीन खुलासे होत आहेत.

हे वाचलं का?

हे ही वाचा>>Sharad Mohol हत्येमागे भलताच म्होरक्या, आतापर्यंतची सर्वात खळबळजनक अटक!

याप्रकरणात पोलिसांनी या हत्येतील मास्टरमाईंड असलेल्या विठ्ठल शेलार याला अटक केली आहे. पनवेलमध्ये पोलिसांनी सापळा रचत शेलारला अटक केली आहे. या अटकेमुळे मोहोळ आणि शेलार गँगमधील जुना वाद समोर आला आहे.

विठ्ठल शेलार हा मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावाचा रहिवासी आहे. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई देखील करण्यात आली होती. या पूर्वी तो गणेश मारणे गँगसाठी काम करत होता. पिंट्या मारणे याचा खून झाल्यानंतर शेलारने आपलं नेटवर्क तयार करायला सुरुवात केली.

ADVERTISEMENT

2017 मध्ये शेलारची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यानंतर शेलार याने भाजपमध्ये प्रवेश केला होता. पुण्याचे त्यावेळचे पालकमंत्री गिरीश बापट आणि भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत शेलारला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर शेलारची भाजपच्या युवा शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती देखील करण्यात आली होती. शेलारच्या भाजप प्रवेशानंतर जोरदार टीकाही झाली होती.

ADVERTISEMENT

शरद मोहोळचे मुळशी परिसरात वर्चस्व वाढले होते. कंपन्यांमधील कंत्राटे घेण्यावरुन मोहोळ आणि शेलार यांच्यात कुरुबुरी सुरू असल्याचं समोर आलं होतं. मोहोळच्या खुनानंतर विठ्ठल शेलार हा पोलिसांच्या रडारवर होता. अखेर पोलिसांनी पनवेलमध्ये सापळा रचून विठ्ठल शेलारला अटक केली आहे. विठ्ठल शेलारसह त्याचा साथीदार रामदास मारणे याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

हे ही वाचा>> Sharad Mohol : ‘… तर शरद मोहोळची हत्या झाली नसती, ‘त्या’ दोघांबद्दल पोलिसांची कोर्टात स्फोटक माहिती

आता पोलीस तपासामध्ये काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान मोहोळच्या खुनानंतर पुण्यात पुन्हा एकदा टोळीयुद्धा सुरु होतं की काय अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मोहोळच्या खुनानंतर नितेश राणे यांनी मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांची भेट घेतली होती. त्यामुळे देखील अनेक प्रश्न विचारले जात होते. दुसरीकडे शरद मोहोळच्या खुनानंतर त्याचे फ्लेक्स देखील पुण्यात ठिकठिकाणी लागल्याचं समोर आलं होतं.

आता शरद मोहोळच्या खुनातील मास्टरमाईंड पकडला गेल्याने त्याने मोहोळच्या हत्येचा प्लॅन का आखला हे समोर येऊ शकणार आहे. दरम्यान, जमिनीच्या वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT