Sharad Mohol : ‘… तर शरद मोहोळची हत्या झाली नसती, ‘त्या’ दोघांबद्दल पोलिसांची कोर्टात स्फोटक माहिती

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

sharad mohol murder case two laywer escape with accused pune police court pune news
sharad mohol murder case two laywer escape with accused pune police court pune news
social share
google news

Sharad Mohol Murder Case : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळची कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे राहत्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या संपूर्ण हत्याकांडाचा मास्टरमाईड 20 वर्षीय मुन्ना उर्फ साहिल पोळेकर आणि मामा नामदेव कानगुडे होता. या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली होती. यामध्ये रवींद्र वसंत पवार (40) व संजय रामभाऊ उढाण (43) या दोन वकिलांचा देखील समावेश होता. या दोन वकिलांचा या हत्याकांडात हात होता का? तसेच शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्याकांडात त्यांनी नेमकी काय भूमिका बजावली होती? हे जाणून घेऊयात. (sharad mohol murder case two laywer escape with accused pune police court pune news)

दोन्ही आरोपी वकिलांची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपी वकिलांना शरद मोहोळ यांच्या खुनाची आधीच माहिती होती. कारण आरोपी नामदेव कानगुडे याने वकिलांना, मी शरद मोहोळ याचा खून करणर असल्याचे आधीच सांगितले होते. तसेच खुनाच्या या घटनेंतर आरोपींसोबत वकील देखील पळून जाण्याच्या तयारीत होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : Mla Disqualification : “नार्वेकरांचा निर्णय हाच भूकंप असेल”, चव्हाणांचं मोठं विधान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वकिल आणि आरोपी कानगुडे 15 डिसेंबरला भेटले होते. इतकचं नाही कर कानगुडे सातत्याने वकील रवींद्र पवार यांच्या संपर्कात होता. यामागचं कारण म्हणजे पोळेकर आणि कानगुडेंवर यापूर्वीच अनेक गुन्हे दाखल आहेत. या गुन्हयाची केस आरोपी वकिलांकडे होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हत्येनंतर वकिलांना काय केले?

शरद मोहोळचा खुन केल्यानंतर आरोपींनी वकिलांना फोन करून या घटनेची माहिती दिली होती. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून रिक्षातून कात्रज परिसरात दाखल झाले होते.त्यानंतर दोन्ही वकील आरोपींना भेटण्यासाठी खेड शिवापूर टोलनाका परिसरात गेले होते. कारमधील एक वकील गाडीत उतरून आरोपींच्या गाडीत बसला. तर दुसऱ्या वकिलाच्या गाडीत तीन आरोपी जाऊन बसले. यानंतर तब्बल 15 ते 16 किलोमीटर आरोपी आणि वकिलांनी प्रवास केल्यानंतर दोन ठिकाणी ते चर्चा करण्यास थांबल्याचे पोलीस तपासात निष्पण्ण झाले होते.

हे ही वाचा : Rupali चाकणकरांना उतावीळपणा नडला, मुंबई पोलिसांनी सांगितली ‘त्या’ घटनेची सत्यता

या दरम्यान आरोपींना त्याच्या नातेवाईकांनी नवीन सिमकार्ड आणि काही पैसै दिले होते. त्यामुळे त्याचवेळी आरोपींनी जुने सिम कार्ड फेकून देत नवीन सिम कार्ड भरले होते. विशेष म्हणजे या प्रकरणात वकिलांनी आरोपींना पोलिसांना शरण जाण्यासाठीही प्रयत्न केले नाहीत,अशी माहिती आतापर्यंत समोर आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आता गुन्हे शाखा करत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT