चाकूने वार करत तरुणीने प्रियकरालाच संपवलं! नंतर, स्वत:ला सुद्धा जखमी केलं अन्... नागपुरात प्रेमसंबंधातून भयानक घटना

योगेश पांडे

नागपुरात एका तरुणीने आपल्याच प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर, आरोपीने प्रेयसीने हत्येनंतर स्वत:ला सुद्धा जखमी करून घेतल्याचं सांगितलं जात आहे.

ADVERTISEMENT

नागपुरात प्रेमसंबंधातून भयानक घटना
नागपुरात प्रेमसंबंधातून भयानक घटना
social share
google news

बातम्या हायलाइट

point

चाकूने वार करत तरुणीने प्रियकरालाच संपवलं!

point

हत्येनंतर, प्रेयसीने स्वत:ला जखमी केलं अन्...

point

नागपुरातील धक्कादायक घटना

Nagpur Crime: नागपुरात प्रेमसंबंधातून एक भयानक घटना घडल्याची बातमी समोर आली आहे. येथील नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीतील परिसरात एका तरुणीने आपल्याच प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची माहिती आहे. इतकेच नव्हे तर, आरोपीने प्रेयसीने हत्येनंतर स्वत:ला सुद्धा जखमी करून घेतल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी आरोपी तरुणीविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या, आरोपीवर नागपुरच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची पूर्णपणे बरी झाल्यानंतर, तिला अटक केली जाईल. 

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणातील मृत तरुणाचं नाव बालाजी कल्याणे असून तो मूळचा नांदेडचा रहिवासी होता आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी नागपूरात भाडेतत्त्वावर राहत होता. दरम्यान, बालाजीचे रती देशमुख नावाच्या 25 वर्षीय तरुणीसोबत प्रेमसंबंध तयार झाले. ती सुद्धा मूळ नांदेडची रहिवासी असून शहरातील एका कॉलेजात BAMS चं शिक्षण घेत होती. 

हे ही वाचा: पोटच्या लेकानेच आईवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं! दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागात तरुणाचं भयंकर कृत्य...

प्रियकराच्या गळ्यावर चाकूने वार केले अन्... 

रती आणि बालाजीचे मागील बऱ्याच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. परंतु, आपल्या प्रेयसीचे कोणा दुसऱ्याच तरुणासोबत प्रेमसंबंध सुरू असल्याचा बालाजीला संशय आला. याच कारणावरून त्या दोघांमध्ये सतत वाद व्हायचे. घटनेच्या दिवशी, रती बालाजीच्या घरी पोहोचली. त्यावेळी, दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि रात्री जवळपास तीन वाजताच्या सुमारास रतीने बालाजीच्या गळ्यावर चाकूने वार केले. या हल्ल्यात पीडित तरुणाचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर, तिने स्वत:ला सुद्धा जखमी करून घेतलं.

हे ही वाचा: मुंबई: "मोठ्या सिनेमात काम देतो..." ऑडिशनच्या नावाखाली तरुणींचे अर्धनग्न फोटो मागितले अन् भेटायला बोलवून...

प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल 

प्रियकराच्या हत्येनंतर, कोणालाच संशय येऊ नये म्हणून रती जोरजोरात "वाचवा, वाचवा..." असं ओरडू लागली. तरुणीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून दुसऱ्या खोलीत झोपलेल्या बालाजीच्या मित्रांना जाग आली. त्यांनी तातडीने बालाजी आणि रतीला रुग्णालयात नेलं. दरम्यान, डॉक्टरांनी बालाजीला मृत घोषित केलं, तसेच रतीला थोडी दुखापत झाल्याने तिच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आरोपी प्रेयसी रती देशमुख हिच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून रुग्णालयातून तिला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तिला अटक करण्यात येणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

हे वाचलं का?

    follow whatsapp