पोटच्या लेकानेच आईवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं! दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागात तरुणाचं भयंकर कृत्य...

मुंबई तक

एका तरुणाने आपल्या वृद्ध आईला जिवंत जाळल्याची बातमी समोर आली आहे. दारूसाठी पैसे न दिल्याच्या वादातून आरोपीने आईसोबत हे भयंकर कृत्य केलं.

ADVERTISEMENT

दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागात तरुणाचं भयंकर कृत्य...
दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागात तरुणाचं भयंकर कृत्य...(फोटो सौजन्य: Grok AI)
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पोटच्या लेकानेच आईवर पेट्रोल ओतून जिवंत जाळलं!

point

दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागात तरुणाचं भयंकर कृत्य...

Crime News: ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. येथे एका तरुणाने आपल्या वृद्ध आईला जिवंत जाळल्याची बातमी समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलगा आणि आईमध्ये सतत वाद होत होते. मात्र, हा वाद टोकाला पोहोचला आणि रागाच्या भरात तरुणाने आपल्या आईसोबत अतिशय भयंकर कृत्य केलं. 

पैसे न दिल्याने आईवर केला हल्ला 

ही भयानक घटना भद्रक जिल्ह्यातील तिहिडी पोलीस स्टेशन हद्दीत घडली. येथील गलगंडा गावात राहणाऱ्या एका देबाशीष नायक नावाच्या 45 वर्षीय तरुणाने आपल्या वृद्ध आईकडे दारू खरेदीसाठी पैसे मागितले होते. मात्र, त्यावेळी आरोपीच्या 65 वर्षीय आईने मुलाला पैसे देण्यासाठी नकार दिला. त्यावेळी, दोघांमध्ये मोठा वाद झाला आणि पैसे न दिल्यामुळे संतापलेल्या देबाशीषने अचानक आपल्या आईवर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीररित्या जखमी झाल्याने वृद्ध महिला अचानक जमिनीवर कोसळली आणि बेशुद्ध झाली. 

पेट्रोल ओतून पेटवून दिलं अन्... 

स्थानिकांच्या मते, देबाशिषला दारूचं व्यसन असून त्याच्यामुळे घरी सतत वाद व्हायचे. पण त्याच्या रागातून इतकी भयानक घटना घडेल, याची कोणालाच अपेक्षा नव्हती. हल्ला केल्यानंतर, पीडिता जमिनीवर कोसळली आणि त्यावेळी आरोपीने तिच्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिलं. वृद्ध महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील लोक घटनास्थळी गोळा झाले. परंतु, तोपर्यंत आरोपी तिथून पळून गेला होता. हे भयंकर दृश्य पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. 

हे ही वाचा: मुंबई: "मोठ्या सिनेमात काम देतो..." ऑडिशनच्या नावाखाली तरुणींचे अर्धनग्न फोटो मागितले अन् भेटायला बोलवून...

पोलिसांची माहिती 

त्यानंतर, पीडित महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. तिला आधी भद्रक जिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं मात्र, तिथे डॉक्टरांनी तिची गंभीर प्रकृती असल्याकारणाने तिला कटक येथील SCB रुग्णालयात रेफर केलं. पोलिसांच्या माहितीनुसार, महिलेचं शरीर जास्त प्रमाणात भाजलं असून तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp