मुंबई: "मोठ्या सिनेमात काम देतो..." ऑडिशनच्या नावाखाली तरुणींचे अर्धनग्न फोटो मागितले अन् भेटायला बोलवून...
मुंबईतून चित्रपटात आणि वेब सीरिजमध्ये अभिनयाचं काम देण्याचं आमिष दाखवून तरुणींची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने तरुणींची फसवणूक
ऑडिशनच्या नावाखाली पीडितांचे अर्धनग्न फोटो मागितले अन्...
मुंबईतील धक्कादायक घटना
Mumbai News: मुंबईतून चित्रपटात आणि वेब सीरिजमध्ये अभिनयाचं काम देण्याचं आमिष दाखवून तरुणींची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. प्रकरणातील आरोपी ऑडिशनच्या बहाण्याने तरुणींना ब्लॅकमेल करायचा. मुंबईतील खार पोलिसांनी या अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी चित्रपट आणि वेबसीरिजशी संबंधित असलेल्या नावाजलेल्या लोकांच्या नंबर आणि फोटोंचा वापर करून महिला तसेच तरुणींना अभिनयाचं काम देण्याचं आश्वासन द्यायचे. त्यानंतर, ऑडिशनला बोलवण्याच्या बहाण्याने पीडितांकडून ऑनलाइन पैसे मागवून नंतर आपला फोन नंबर बंद करायचे.
ऑडिशनच्या बहाण्याने खाजगी फोटो पाठवले अन्...
पीडित महिलांनी पोलिसांना सांगितले की, अज्ञात आरोपीने स्वतःची प्रसिद्ध निर्माता विकास बहल अशी ओळख सांगितली होती आणि या नावाने नावाने त्याचं इंस्टाग्राम अकाउंट देखील होतं. त्यामुळे पीडित तरुणींनी आरोपीला निर्माता समजून त्याला पैसे दिली आणि काही खाजगी फोटो सुद्धा पाठवले.
हे ही वाचा: नागपूर: "दीड कोटी रुपये दे, नाहीतर तुझी मुलगी..." पोलीस अधिकाऱ्यालाच फोन करून दिली धमकी अन्...
पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ऑडिशनच्या बहाण्याने बऱ्याच मुलींशी संपर्क साधल्यानंतर, आरोपीने कथित निवड प्रक्रियेचा भाग म्हणून पीडित तरुणींकडून बिकिनीवरील तसेच त्यांचे अर्धनग्न फोटो मागितले. त्यातील कित्येक तरुणींना तर आरोपीने भेटण्यासाठी बोलवलं होतं. जेव्हा खरा निर्माता-दिग्दर्शक विकास बहल यांना त्यांच्या नावाने फसवणूक सुरू असल्याचे कळलं तेव्हा त्यांनी खार पोलिस ठाण्यात जाऊन एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली.
हे ही वाचा: पाकिस्तानमध्ये HIV संक्रमण महामारीप्रमाणे पसरलं, रुग्णांमध्ये 200 टक्क्यांनी वाढ, WHO महत्त्वाचा इशारा
पोलिसांचं तरुणींना आवाहन
तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी बनावट निर्मात्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा तपास सुरू केला आहे. फसवणूक, आयटी कायदा आणि महिलांचा छळ या कलमांखाली आरोपी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे पीडित तरुणींसोबत झालेल्या चॅट्स, त्याचे सोशल मीडिया अकाउंट, कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेज याचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणासंबंधी, खार पोलिसांनी महिला आणि तरुणींना आवाहन केलं आहे की त्यांनी अधिकृत पुष्टीशिवाय कोणत्याही ऑडिशन किंवा कास्टिंग कॉलवर विश्वास ठेवू नये.










