‘खुशीला मारलं, आता तिच्याजवळ जातोय’, त्याने फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच…
फेसबुकवर लाईव्ह येऊन सगळा प्रकार सांगितल्यानंतर अंकित कुमारने 13 मे रोजी दुपारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. एक दिवसापूर्वी त्याने रांचीमध्ये निवेदिता नावाच्या विद्यार्थिनीची गोळ्या घालून हत्या केली होती.
ADVERTISEMENT

“मी खुशीला मारले आहे. आता मी स्वतःला मारत आहे. मी लोकेशन पाठवले आहे. माझा 87 वाला नंबर चालू आहे. तुम्ही लोक या नंबर कॉल करू शकता. अनुराधा दीदीला लोकेशन पाठवलं आहे. करंट लोकेशन. खुशीला मारून टाकलं, आता तिच्याकडे चाललो आहे. बाय-बाय”, असं म्हणत त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली. हे सगळं घडलं फेसबुक लाईव्ह सुरू असताना.
फेसबुकवर लाईव्ह येऊन सगळा प्रकार सांगितल्यानंतर अंकित कुमारने 13 मे रोजी दुपारी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. एक दिवसापूर्वी त्याने रांचीमध्ये निवेदिता नावाच्या विद्यार्थिनीची गोळ्या घालून हत्या केली होती.
अंकितने शनिवारी कोकर यांच्या अयोध्यापुरी येथील घरात स्वत:वर गोळी झाडली. त्याचा जागीच मृत्यू झाला. ज्या पिस्तुलाने त्याने निवेदिता उर्फ खुशी हिच्यावर गोळी झाडली होती, त्याच पिस्तुलाने त्याने स्वतःवरही गोळी झाडली.
पोलिसांकडून सुरू होता शोध
दुसरीकडे, त्याला पकडण्यासाठी बिहारमधील नवादासह अनेक ठिकाणी पोलीस छापे टाकत होते. अंकित कुमार हा अरगोडा येथे भाड्याच्या घरात राहत होता. अंकित आणि निवेदिता यांचे बरेच दिवस प्रेमसंबंध होते. निवेदिता दोन महिने अंकितशी बोलत नव्हती. याचा राग येऊन अंकितने तिलाच संपवलं.