YouTuber चा संशयास्पद अवस्थेत सापडला मृतदेह, धक्कादायक माहिती आली समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

youtuber malti chauhan death dead body hanging husband house last video before
youtuber malti chauhan death dead body hanging husband house last video before
social share
google news

YouTuber Murder: उत्तर प्रदेशातील संत कबीर नगर येथे राहणारी प्रसिद्ध YouTuber मालती चौहानचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मालती चौहान (Malati Chauhan) हिचा मृतदेह (Dead Body) घरात लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. मृत्यूच्या काही तास आधी मालतीने तिच्या यूट्यूब चॅनलवर (YouTube channel) एक व्हिडिओही अपलोड केला होता. त्या व्हिडीओमध्ये तिने माहेरी होते आता मी सासरच्या घरी जात असल्याचे सांगितले होते, त्यामध्ये तिने म्हटले होते की, आता मला नवरा मारणार की ठेवणार हे मला माहिती नाही.(youtuber malti chauhan death dead body hanging husband house last video before)

ADVERTISEMENT

माझं काही वाईट झालं तर…

मालती चौहानकडून जो व्हिडीओ अपलोड करण्यात आला आहे. त्यामध्ये ती म्हणते की, सासरी जे घर आहे ते मी बांधले आहे, त्यामुळे त्या घरावर माझा हक्क आहे. त्यामुळे माझ्या हक्काच्या घरात राहण्यापासून मला कोणीही थांबवू शकत नाही. तसेच सासरी गेल्यानंतर माझ्याबाबतीत जर काही वाईट घडले तर मात्र त्याला जबाबदार माझा नवरा म्हणजेच विष्णू चौहान असेल असंही तिने म्हटले आहे.

हा व्हिडीओ शेवटचा

आपल्या मृत्यूबद्दल बोलत असताना तिने असंही म्हटले आहे की, नवऱ्याला जर दुसऱ्या कुणासोबत व्हिडीओ बनवायचे असतील तर त्याने बनवावे मात्र मी माझे चॅनेल बंद करणार नाही असंही स्पष्टपणे सांगितले होते. यावेळी तिने आपल्या चाहत्यांना मला सहकार्य करा असंही आवाहन केले होते. मात्र मालतीचा हा व्हिडीओ शेवटचा असेल असं कधीच कोणाला वाटलं नव्हतं.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> बहिणीला हात लावताच मेहुण्यासह कुटुंबाचे तुकडे-तुकडे, भावाचं थरकाप उडवणारं कृत्य!

मालतीला मारहाण

या प्रकरणी आता माहुली पोलिसात तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मालती चौहानचा मृतदेह तिच्या सासरच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना घडल्याचे लक्षात येताच तिच्या घरासमोर प्रचंड गर्दी जमा झाली होती. त्यानंतर पोलिसांनी तक्रार दाखल केला आहे. तर तिच्या वडिलांनी आपली मुलगी असं काही करु शकत नाही असं सांगितले आहे. यावेळी त्यांनी मालतीच्या नवऱ्यावर गंभीर आरोपही केले आहेत. तो मालतीला मारहाण करत होता असंही त्यांनी सांगितले.

सासरच्या मंडळींवर आरोप

मालतीच्या वडिलांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांपासून मालतीचा हुंड्यासाठी छळ करण्यात येत होता. हुंड्यासाठी माझ्या मुलीची हत्या करण्यात आल्याचा आरोप त्यांनी मालतीच्या नवऱ्यासह सासरच्या मंडळींवर आरोप केला आहे. त्यामुळे आता मालतीच्या सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करुन तपास सुरु करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

देसी स्टाइल रिल्स

मालती चौहान ही गरीब कुटुंबीतील होती. तिच्या देसी स्टाइल रिल्स आणि व्हिडिओंमुळे ती प्रचंड व्हायरल झाली होती, आणि त्यामुळे ती प्रसिद्धही झाली होती. रोजच्या लाईपस्टाईलविषयी ती व्हिडीओ करत होती. यू ट्यूबवर तिचे दोन चॅनेल आहेत. तिच्या मालती चौहान फन नावाच्या चॅनलवर 6 लाख 59 हजार तर मिस्टर युवराज फन नावाच्या चॅनलवर 6 लाख 44 हजार सबस्क्रायबर्स आहेत. मालती आधी पती विष्णूसोबत व्हिडीओ बनवत होती, मात्र काही दिवसांपूर्वी तिचा आणि तिच्या नवऱ्याचा वाद झाला होता. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. त्यातच आता तिचा मृतदेह सापडल्याने अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> डान्स करत तरुणी झाली विवस्त्र, भंडाऱ्यातील ‘त्या’ व्हिडीओमुळे उडाली खळबळ…

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT