Ketaki Chitale ला कोणत्या आधारावर अटक केली? केंद्रीय महिला आयोगाने मागितलं उत्तर
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या अटकेविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. मला करण्यात आलेली अटक बेकायदा आहे असा दावा केतकीने याचिकेत केला आहे. तसंच केतकी चितळे प्रकरणात केंद्रीय महिला आयोगासमोर सुनावणीसमोर पार पडली. त्यावेळी केतकी चितळेला कोणत्या आधारे अटक करण्यात आली आहे? असा प्रश्न महिला आयोगाने […]
ADVERTISEMENT

mumbaitak
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेने तिच्या अटकेविरोधात हायकोर्टात धाव घेतली आहे. मला करण्यात आलेली अटक बेकायदा आहे असा दावा केतकीने याचिकेत केला आहे. तसंच केतकी चितळे प्रकरणात केंद्रीय महिला आयोगासमोर सुनावणीसमोर पार पडली. त्यावेळी केतकी चितळेला कोणत्या आधारे अटक करण्यात आली आहे? असा प्रश्न महिला आयोगाने विचारला आहे.
केतकी चितळेला कोणत्या आधारे अटक केली? तिला अटक करताना नोटीस दिली होती का? असे प्रश्न आयोगाने उपस्थित केले आहेत. अशा स्वरूपाच्या केसेसच्या डेटा पोलिसांकडून आयोगाने मागितला आहे. केंद्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली ही सुनावणी पार पडली.
महिला आयोगाने काय प्रश्न उपस्थित केले आहेत?