Crime: महिलेचं अपहरण करून निर्जनस्थळी नेले, नग्न होण्यास भाग पाडलं आणि…,डोंबिवलीत काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.या घटनेत खिंडारेश्वर मंदिरातून दर्शन घेऊन परतत असताना महिलेचे अपहरण करण्यात आलं, आणि तिला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना हा प्रकार कळताच त्यांना तातडीने नराधमाच्या तावडीतून महिलेची सुटका केली. आणि नराधम प्रभाकर पाटील आणि वैभव तरे यांना मानपाडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पोलीस कर्मचारी सुधीर हसे आणि अतुल भोईर यांनी महिलेचा जीव आणि अब्रू वाचविल्या प्रकरणी आता दोन्ही पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.(two rickshaw driver kidnapped women and molest dombivli crime news)

डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव परिसरात राहणाऱी एक महिला शुक्रवारी संध्याकाळी खिडकाळेश्वर मंदिरात गेली होती. दर्शन घेऊन ती घरी परत असताना रिक्षावाल्यासह तिच्या एका साथीदाराने तिचे अपहरण केले. हा साथीदार आधीच रिक्षात बसला होता. यावेळी रिक्षा जेव्हा निर्जनस्थळी जात होती. याच दरम्यान गस्तीवर असणारे मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस बीट मार्शल सुधीर हसे आणि अतुल भोई यांनी पाहिले. तोपर्यंत रिक्षा पुढे निघून गेली होती. मात्र या दोन्ही पोलिसांना रिक्षा निर्जनस्थळी का जात आहे याचा संशय आला.

हे ही वाचा : Rajendra Gudha : अशोक गेहलोत सरकारला हादरवून सोडणाऱ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

दोघांनीही रिक्षाचा पाठलाग सुरु केला. थोड्याच वेळात हे दोन्ही पोलीस रिक्षाजवळ पोहचले. मात्र महिलेची अवस्था पाहून या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना प्रकार लक्षात आला. क्षणाचाही विलंब न लावता दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी नराधमांच्या दिशेने झडप घेतली. दोन्ही नराधम आणि पोलिसांत हाणामारी झाली. दोघा नराधमांनी एका पोलिसावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस सुधीर हसे हे गंभीर जखमी झाले.मात्र तरी देखील त्यांनी त्या दोघा नराधमांना सोडले नाही. पकडून ठेवत पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मानपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश मदने हे घटनास्थळी दाखल झाले. दोघाही नराधमाना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये प्रभाकर पाटील हा नराधम कल्याण ग्रामीणमधील उसरघर परिसरात राहतो. तो रिक्षा चालवितो. त्याचा साथीदार वैभव तरे हा देखील रिक्षा चालक आहे. वैभव याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. तो दिवा येथील आगासन येथे राहणारा आहे. या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

दरम्यान मानपाडा पोलिसांच्या सर्तकतेमुळे एका महिलेचा जीव आणि अब्रू वाचली आहे. धाडसी कामगिरी करणाऱ्या दोन्ही पोलिस सुधीर हसे आणि अतुल भोई यांच्या मानपाडा पोलिसांकडून कौतूक करण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Chandrayaan 3 Vikram lander New Image : रात्री कसा दिसतो विक्रम लँडर, चांद्रयान-2 ऑर्बिटर पाठवला फोटो

    follow whatsapp

    ADVERTISEMENT