बदलापूर शाळा प्रकरण: अक्षय शिंदेच्या घराची तोडफोड
अक्षय शिंदेने बदलापूरातील शाळेत दोन मुलींवर अत्याचार केला. त्याच्या घराची तोडफोड केली गेली.
ADVERTISEMENT
अक्षय शिंदेने बदलापूरातील शाळेत दोन मुलींवर अत्याचार केला. त्याच्या घराची तोडफोड केली गेली.
अक्षय शिंदे नावाच्या सफाई कर्मचार्याने बदलापूरातील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंग केला. या घटनेनंतर बदलापूर शहरात एकच खळबळ माजली. आरोपीला फाशी देण्याची मागणी करत लाखो बदलापूरकर काल रस्यावर उतरले. पोलिस प्रशासनालाही न जुमानता काल लाखोंच्या जनसमुदायाने बदलापूर रेल्वे स्थानकावर ठिय्या मांडत रेल रोको केला. दरम्यान संतप्त नागरिकांनी लाठीचार्ज करण्याऱ्या पोलिसांवर दगडफेक केली. वातावरण चिघळलं असतानाचं एकनाथ शिंदेंनी हा मुद्दा फास्ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचे सांगितले. या संदर्भात राजकीय वर्तुळातूनही संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या. अखेर सायंकाळी बदलापूरकरांचा आक्रोश मावळल्यानंतर वातावरण शांत झाले, परंतू आरोपी अक्षय शिंदेच्या फाशीची मागणी करण्यात येत आहे. या घटनेवरून समाजमन अशांत झालं असून आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. याच घटनेच्या निषेधार्थ बदलापूरमधील आरोपी अक्ष्य शिंदे याचे घर संतप्त गावकर्यांकडून फोडण्यात आले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT