जळगाव मर्डर: 30 लाखासाठी सहकाऱ्याचा फिल्मी स्टाईल मर्डर

मुंबई तक

ADVERTISEMENT

जळगावातील हत्या प्रकरणात ३० लाख रुपयांसाठी सहकाऱ्याने सेवानिवृत्त परिचारिकेचा फिल्मी स्टाईल मर्डर केल्याचे समोर आले आहे.

social share
google news

जळगावातील हत्या प्रकरणाची सध्या सर्वत्र चर्चा सुरुये. सेवानिवृत्त परिचारिका स्नेहलता चुंबळे यांच्यासोबत पैसे काढायला गेलेल्या सहकाऱ्यानेच त्यांची गळा दाबून हत्या केलीये. फ्लॅटसाठी स्नेहलता बॅंकेत ३० लाख रुपये काढायला गेल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचा सहकारी जिजाबराव देखील होता. पैसे बघितल्याने त्याचे डोळे फिरले आणि त्याने हे धक्कादायक कृत्य केलं. या प्रकरणी पोलिसांनी जिजाबराव आणि त्याचा सहकारी विजय निकम यांना अटक केलीये. इतकचं नाही तर आपल्याला अटक होऊ शकते अशी शक्यता दोन्ही आरोपींना होती. त्यामुळे आधीच त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रत्येकी सव्वा सव्वा लाख रुपये त्या ३० लाखातून काढून ठेवले होते. नाशिकमध्ये मुलाकडे राहत असलेल्या स्नेहलता २० ऑगस्ट रोजी जळगावला सोसायटीच्या सभेला आल्यानंतर बेपत्ता होत्या. त्यांची २२ ऑगस्ट रोजी तालुका पोलीस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास करत असताना ३० लाखांसाठी हत्या करणारा जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपिक जिजाबराव पाटील आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागातील लिपिक विजय निकम यांनी रचलेला कट समोर आला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT