शरद पवारांवर आक्षेपार्ह पोस्ट, उच्च शिक्षित तरुणाला ठोकल्या बेड्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Youth arrested for writing offensive posts social media against ncp chief Sharad Pawar
Youth arrested for writing offensive posts social media against ncp chief Sharad Pawar
social share
google news

Sharad Pawar: राज्यातील राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी तापलेले असतानाच राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्येही मोठी चुरस दिसून येत आहे. राजकीय नेत्यांप्रमाणेच त्यांच्या कार्यकर्त्यांकडूनही वेगवेगळी टीका केली जाते, मात्र काही वेळा पातळी सोडून टीका केली जात असल्याने काही प्रकरणं ही पोलीस स्टेशनपर्यंत जात असतात. मुंबईतही असाच प्रकार घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) प्रमुख शरद पवार यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण केल्या प्रकरणी विशाल गोर्डे याला अटक करण्यात आली आहे. विशाल गोर्डे या उच्चशिक्षित असून त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार झाल्याने त्याला आता अटक (Arrested) करण्यात आली आहे.

कायदा हातात घ्यावा लागेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याविषयी सोशल मीडियावर विशाल गोर्डेने आक्षेपार्ह लेखन केले होते. त्यामुळे आता पुन्हा एकदा सोशल मीडिया वरील लेखन आणि राजकीय नेत्यांवरील टीकेवरून वाद रंगला आहे. उच्चशिक्षित असलेल्या विशाल गोर्डे याने शरद पवारांच्यावर आक्षेपार्ह लेखन केल्यानंतर शरद पवार गटाच्या प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी पोलिसात गोर्डे विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावेळी पोलिसांकडे त्यांनी आक्षेपार्ह लेखन करणाऱ्याला तात्काळ अटक करून त्याला शिक्षा द्यावी अशीही मागणी करण्यात आली होती.

हे ही वाचा >> Maharashtra Politics : खैरे-दानवेंनी वाढवला ठाकरेंचा ताण, मातोश्रीवरील बैठकीत काय झालं?

गोर्डेला पोलीस कोठडी

पोलिसांनी त्याला जर अटक केली नाही तर आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशाराही भावना घाणेकर यांनी दिला होता. त्यानंतर त्याच्यावर कारवाई करून त्याला वाशी न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. त्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

नोकरी गेल्यामुळं नैराश्य

या प्रकरणी माहिती देताना सीबीडी-बेलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांनी विशाल गोर्डेने जामिनासाठी अर्ज केला असल्याचेही त्यांनी सांगितले. विशाल गोर्डेला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांना सांगितले की, कोरोनाच्या काळात माझी नोकरी गेली होती. त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या खचलेला होतो. नोकरी गेल्यानंतर कंपन्यांना कर्मचारी पोहचवण्याचं काम मी करत होतो मात्र त्यातून पैसे मिळत नव्हते, त्याच नैराश्येतून हा प्रकार घडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Sharad Pawar : “काकांच्या सावलीत वाढलेले अजित पवार…”, आव्हाडांनी इतिहासच काढला

    follow whatsapp

    ADVERTISEMENT