'आर. आर. पाटलांनी माझा केसाने गळा कापला', अजित पवारांच्या विधानाने मोठी खळबळ
Ajit Pawar: सिंचन चौकशीच्या फाईलवर गृहमंत्री आर. आर. पाटील यांची सही होती आणि ती फाइल मला फडणवीसांनी दाखवलेली. असं विधान करत अजित पवार यांनी आता पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सिंचन चौकशीच्या फाईलवर गृहमंत्री आर. आर. पाटील यांची सही होती, अजितदादांचा दावा

अजित पवार म्हणाले, ती फाइल मला फडणवीसांनी दाखवलेली

अजित पवारांच्या विधानाने नवा वाद
Ajit Pawar on Tasgaon: तासगाव: महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसंतसं राजकीय वातावरण हे अधिकच तापू लागलं आहे. त्यातच नवनवे आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी तासगावमध्ये बोलताना आर. आर. पाटील यांच्याबाबत एक खळबळजनक विधान केलं. 'आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला.' असं म्हणत अजितदादांनी आता एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे.
तासगावच्या सभेत नेमकं काय म्हणाले अजितदादा...
'माझ्यावर आरोप झाले, मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. म्हणाले याच्यावर 70 हजार कोटीचा आरोप करूया.. सारखं 70 हजार, 70 हजार म्हणायचे.. अजितराव घोरपडे त्या खात्याचे मंत्री होते. माझ्यावर आरोप झाला ना त्या दिवसापर्यंत महाराष्ट्राची 1 मेला निर्मिती होऊन त्या दिवसापर्यंत पगाराचा आणि सगळा खर्च हा 42 हजार कोटीचा आणि मला 70 हजार कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणाले..'
हे ही वाचा>> Ajit Pawar: "लोकसभेला ताई आणि विधानसभेला...", बारामतीत अजित पवार झाले भावुक, नेमकं काय म्हणाले?
'42 हजार कोटी खर्च झाले आजपर्यंत आणि तिथे 70 हजार कोटी.. नाही.. आकडा जेवढा मोठा तेवढं लोकांना वाटतं की, असंल बरं का.. असंल बरं का.. झालं माझी वाटच लागली. त्यातून एक फाईल तयार झाली.'
'ती फाईल गृहखात्याकडे जाते. ह्यांनी.. (आर. आर. पाटील) त्या फाइलवर अजित पवाराची ओपन इन्क्वायरी करावी म्हणून सही केली. केसाने गळा कापायचे धंदे आहेत राव!'