Lawrence Bishnoi : लॉरेन्स गँगचं नेटवर्क उध्वस्त होणार? NIA कडून अनमोल बिश्नोईवर 10 लाखांचं बक्षीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

लॉरेन्स गँग केंद्रीय यंत्रणांच्या निशाण्यावर
लॉरेन्स गँग केंद्रीय यंत्रणांच्या निशाण्यावर
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाबा सिद्दीकी प्रकरणानंतर लॉरेन्स यंत्रणांच्या रडारवर

point

लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईवर बक्षीस

point

लॉरेन्स गँगला उध्वस्त करणार?

Lawrence Bishnoi Update मुंबई : लॉरेन्स बिश्नोई हा गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये यंत्रणांच्या रडारवर आहे. त्यानंतर आता NIA ने लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईवर 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. अनमोल बिश्नोई उर्फ भानु हा लॉरेन्सचा भाऊ असून, प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात तो आरोपी आहे. 2024 मध्येच तपास यंत्रणांनी त्याच्याविरोधात चार्जशीट दाखल केली होती. त्यानंतर तो आता बनावट पासपोर्टच्या मदतीने विदेशात फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. 

हे ही वाचा >>Constituency Wise congress Candidates List: काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवार जाहीर; ठाकरेंना काय संदेश?

अनमोल बिश्नोई हा नेहमी आपल्या राहण्याची ठिकाणं बदलत असायचा अशी माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे. तसंच तो सध्या कॅनडामध्ये असल्याचंही समोर आलं आहे. अनमोल बिश्नोईवर आतापर्यंत 18 गुन्हे दाखल आहे. त्यासाठी तो जोधपूरमधील तुरूंगातही कैद होता. अनमोलला 7 ऑक्टोबरला जामीनावर सोडण्यात आलं होतं. 

 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>NCP Sharad Pawar: पाहा तुमच्या मतदारसंघात शरद पवारांनी कोणाला दिली उमेदवारी!Ladki Bahin Yojana |

 

दरम्यान, महाराष्ट्रात मागच्या काही दिवसांमध्ये घडलेल्या गुन्हेगारीच्या घटनांनंतर लॉरेन्स बिश्नोई हे नाव सध्या चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येच्या घटनेनंतर आता लॉरेन्स बिश्नोईबद्दल अनेक गोष्टी समोर येत आहेत. गुन्हेगारी जगतात आपला जम वाढवत असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला आता बॉलिवूडवरही दबदबा निर्माण करायचा असल्याचं दिसतंय. सलमान खानला धमकी देणं, सलीम खान यांना धमकावणं, सलमानच्या घरावर फायरिंग करणं आणि थेट सलमानचे निकटवर्तीय आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकींची हत्या, यामुळे आता लॉरेन्सच्या या पॅटर्नची तुलना थेट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी केली जात आहे. लॉरेन्स बिश्नोई हा गेल्या अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये यंत्रणांच्या रडारवर आहे. त्यानंतर आता NIA ने लॉरेन्सचा भाऊ अनमोल बिश्नोईवर 10 लाखांचं बक्षीस जाहीर केलं आहे. 

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT