Constituency Wise congress Candidates List: काँग्रेसची पहिली यादी जाहीर, 48 उमेदवार जाहीर; ठाकरेंना काय संदेश?
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी काँग्रेसने आपली पहिली यादी नुकतीच जाहीर केली आहे. ज्यामध्ये काँग्रेसने 48 उमेदवारांना तिकीट दिलं आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

काँग्रेसने कोणाला दिली उमेदवारी, कोणाचा पत्ता केला कट?

काँग्रेसकडून 48 उमेदवारांची यादी जाहीर
Maharashtra Assembly Election 2024 Congress 1st Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी भाजपने रविवारी (20 ऑक्टोबर) पहिली यादी जाहीर केली. त्यानंतर आता काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत काँग्रेसने 48 उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे.
मागील काही दिवसांपासून जागा वाटपाबाबत काँग्रेस आणि शिवसेना (UBT) मध्ये बरीच सुंदोपसुंदी सुरू होती. एकीकडे आघाडीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे दोन्ही पक्ष हे स्वबळाची भाषा करत असल्याची कुजबूज देखील राजकीय वर्तुळात सुरू होती. अखेर आज काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर करून या सगळ्या चर्चांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शिवसेनेने काल (23 ऑक्टोबर) पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता काँग्रेसनेही आपली पहिली यादी जाहीर केली आहे.
हे ही वाचा>> Mahayuti : महायुतीत 4 जागांवरुन अंतर्गत कलह? 'या' उमेदवारांवर शिंदेंच्या शिवसेनेचा आक्षेप असल्याची चर्चा
एकीकडे भाजप हे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यासोबत निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडमध्ये मागीला काही दिवस हे चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच होतं. पण आता काँग्रेसने शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्यासह महायुतीला टक्कर देण्याची तयारी केली आहे.
महाविकास आघाडीमध्ये नेमक्या कोणाला किती जागा मिळणार यावरून बरेच अंदाज बांधले जात होते. अखेर आता काँग्रेसची पहिली यादी समोर आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमधील जागा वाटपाचं चित्र हे काहीसं स्पष्ट झालं आहे.