Ajit Pawar: 'जर मी इतका वाईट, घाणेरडा, भ्रष्टाचारी होतो तर त्यांनी...', अजितदादांचा थेट सवाल!

साहिल जोशी

ADVERTISEMENT

'जर मी इतका वाईट, घाणेरडा, भ्रष्टाचारी होतो तर त्यांनी...',
'जर मी इतका वाईट, घाणेरडा, भ्रष्टाचारी होतो तर त्यांनी...',
social share
google news

Ajit Pawar Exclusive interview: साहिल जोशी / राजदीप सरदेसाई, बारामती: 'जर मी इतका वाईट, घाणेरडा, भ्रष्टाचारी.. नालायक माणूस होतो तर त्यांनी अटी घालायला पाहिजे होत्या की, हा माणूस सरकारमध्ये असेल तर आम्ही सरकार बनवणार नाही.' असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना थेट सवाल विचारला आहे. मुंबई Tak ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतील अजित पवार त्यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांबाबत पहिल्यांदाच आपल्या विरोधकांना थेट सवाल केला आहे. (ajit pawar exclusive interview if i was so bad dirty corrupt why did they take me in the government ajitdada direct question lok sabha election 2024 baramati)

'एमएससी बँकेत 10 हजार कोटीचा घोटाळा झाला असे आरोप झाले. त्याचा रिपोर्ट तयार आहे. त्यात कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही. असं त्यात निष्पन्न झालेलं आहे अशी माझी माहिती आहे.' असं मोठं विधानही अजित पवार यांनी केलं आहे.

'...तर मला सरकारमध्ये का घेतलं?'

अजित पवार यांच्यावर 70 हजार कोटीच्या घोटाळ्याचे अनेकदा आरोप करण्यात आले आहेत. याचबाबत  जेव्हा त्यांना सवाल विचारण्यात आला तेव्हा त्यांनी याबाबत त्यांचं म्हणणं काय आहे हे स्पष्टपणे सांगितलं.. मात्र, त्याचसोबत त्यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्यांना काही सवालही विचारले.. पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले.. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Lok Sabha Election : निकाल लागण्याआधीच भाजपचा 'हा' उमेदवार विजयी!

प्रश्न: याच भाजपने आपल्यावर आरोप केले सिंचन घोटाळ्याचे.. देवेंद्र फडणवीस, भाजपने.. चक्की पिसिंगची व्हिडिओ नेहमी दाखवली जाते. 

अजित पवार: आरोप केले हे बरोबर आहे.. त्याची चौकशी झाली.. त्यामध्ये अनियमितता झाली.. ते प्रकरण कोर्टात आहे. एमएससी बँकेत 10 हजार कोटीचा घोटाळा झाला असे आरोप झाले. त्यामध्ये सहकार विभागाने, ACB ने चौकशी केली. सीआयडीने, ईओडब्ल्यूने चौकशी केली. न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी झाली. 

ADVERTISEMENT

अशा अनेकांना चौकशी केली. त्याचा रिपोर्ट तयार आहे. त्यात कुठेही भ्रष्टाचार झालेला नाही. असं त्यात निष्पन्न झालेलं आहे अशी माझी माहिती आहे. पण आपल्या इथे न्यायव्यवस्था आहे.. त्याला विलंब लागतो.. त्यामुळे आरोप असलेल्या कार्यकर्त्यांची बदनामी होते. बदनामीची किंमत त्या-त्या व्यक्तीला मोजावी लागते. 

जी आज 70 हजार कोटीचा घोटाळा, बँकेचा घोटाळा यामुळे बदनामीची किंमत आज मी मोजतोय. आज माझी प्रशासनावरची पकड आणि कामाची पद्धत ही उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. मला काम करायला आवडतं. मोदी साहेब पण काम करणारी व्यक्ती आहे. ते सकाळपासून उशिरापर्यंत कामच करत असतात. त्यामुळे कुठे तरी गोष्टी जोडल्या आहेत. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'महाराष्ट्रात एवढ्या जागा मिळतील', पवारांनी आकडाच सांगितला

प्रश्न: तुम्ही या निर्णय घेण्याआधी मोदींनी भोपाळमध्ये 70 हजार कोटीच्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता. कुठेतरी त्यांना पण हे लक्षात आलं का की आपण अन्याय केलाय? 

अजित पवार: जोपर्यंत त्याची संपूर्ण चौकशी होऊन नेमकं सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत इतरांना कसं वाटेल की अन्याय झाला.. जर वस्तूस्थिती पुढे आली तरच ते लोकांना कळणार आहे. 

मी जेव्हा सगळ्यांसोबत होतो तेव्हा सगळेजण माझं समर्थन करत होते. आमचे उद्धव ठाकरे साहेब पण मला बरोबर घेऊन त्यांनी सरकार चालवलं. जर मी इतका वाईट, घाणेरडा, भ्रष्टाचारी.. नालायक माणूस होतो तर त्यांनी अटी घालायला पाहिजे होत्या की, हा माणूस सरकारमध्ये असेल तर आम्ही सरकार बनवणार नाही. किंवा मी तसाच माणूस होतो तर आता मी ज्यांच्या बरोबर गेलो त्यांनी सांगायला पाहिजे होतं की, या माणसाची काही गरज नाही. हा माणूस नालायक आहे.. हा सरकारमध्ये घेण्याच्या लायकीचा नाही. 

मी महाराष्ट्राला स्पष्ट सांगतो.. आजपर्यंत जेवढे पक्ष महाराष्ट्रात आहेत त्यांनी कधीकाळी मला जवळ केलंय ते माझ्या कामामुळेच जवळ केलंय. 

असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्यावर केले जात असलेले घोटाळ्याचे आरोप चुकीचे असल्याचं म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT