Ajit Pawar: बारामतीच्या निकालावर अजित पवारांची सर्वांत मोठी प्रतिक्रिया

सौरभ वक्तानिया

ADVERTISEMENT

 ajit pawar reaction on baramati lok sabha result 2024 supriya sule vs sunetra pawar on lok sabha result maharashtra lok sabha
बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे विजयी ठरल्या आहेत.
social share
google news

Ajit pawar Reaction on Baramati Lok Sabha Result : बारामती लोकसभा मतदार संघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) विजयी ठरल्या आहेत. तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला आहे. या निकालावर आता अजित पवारांची प्रतिक्रिया समोर आली आहे. बारामतीत कुणालाही दोष द्यायचा नाही. मी परफॉर्म करू शकलो नाही. अपयशाची जबाबदारी स्विकारतो मी स्विकारतो, असे अजित पवार (Ajit pawar) यांनी म्हटले आहे. (ajit pawar reaction on baramati lok sabha result 2024 supriya sule vs sunetra pawar on lok sabha result maharashtra lok sabha) 

ADVERTISEMENT

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ट्रायडेंट हॉटेलवर आज बैठक पार पडली.या बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी अजित पवारांनी लोकसभा निवडणूकीचा निकाल आणि बारामतीवर प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्रात जो निकाल आला त्याबाबत मी समाधानी नाही. मी भाजप किंवा शिवसेनेला दोष देणार नाही, मी स्वतः अपयशाची जबाबदारी स्विकारतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

बारामतीच्या निकालावरून आश्चर्यचकीत झालो आहे. बारामतीने मला प्रचंड पाठिंबा दिलेला आहे. पण यावेळेस त्यांनी मला का पाठिंबा दिला नाही याची कल्पना नाही. तसेच मी अमोल मिटकरीला सांगितले, ब्रीफिंग वेगळे होते. बारामतीत काहीही झाले नाही. कुणालाही दोष द्यायचा नाही. मी परफॉर्म करू शकलो नाही. मी जबाबदारी घेतो. सुप्रिया सुळे निवडून आल्या पण मला वाटते की मी स्वत: कामगिरी करू शकलो नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : Amol Kirtikar : अवघ्या 48 मतांनी अमोल किर्तीकर कसे पडले?

राष्ट्रवादीच्या या बैठकीला 5 आमदारांनी दांडी मारली होती. यावर अजित पवार म्हणाले,  काही जण काही अडचणींमुळे येऊ शकले नाहीत. अनेकांनी फोन करून याबाबत सांगितले आहे. तसेच अनेक आमदार शरद पवाराच्या पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यावर अजित पवार म्हणाले, सगळे आमदार आमच्यासोबत आहेत. हे चित्र आज पाहायला मिळालं.

या निवडणुकीत मुस्लिम समाज आमच्यापासून दुरावला गेला आहे. तसेच संविधान बदलण्याचा जो मुद्दा विरोधकांनी मांडला. त्यांनी ज्या प्रकारचा प्रचार केला. या गोष्टीचा फटका आम्हाला बसला आहे. मराठा आरक्षणाचाही मुद्दा आहे. तसेच मराठवाड्यात संभाजीनगर सोडल्यास महायुतीला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे महायुतीतील प्रमुख नेत्यांशी चर्चा करून काही त्रूटी राहिल्या, कुठे कमी पडलो, याबाबत चर्चा करू. तसचे विधानसभा निवडणुकीत चुका होऊ नयेत, यासाठी आम्ही चर्चा करतो आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

जनतेच्या कौल असतो तो लोकशाहीमध्ये स्विकारायचा असतो. नाउमेद ना होता लोकांसमोर जायचं असतं. यश मिळालं म्हणून हुरळून जायचं नसंत आणि अपयश मिळालं म्हणून खचून जायचं नसतं. पुन्हा नव्या उमेदीने विधानसभा निवडणुकीला सामोरे जायचा हा निर्णय बैठकीत घेतल्याचे अजित पवारांनी सांगितले. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Eknath Shinde : मोदींच्या सरकारमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे 'हे' खासदार होणार मंत्री?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT