Ajit Pawar : 'आम्ही आरेला कारे करु शकतो, पण...', शिवतारेंवर अजित पवार स्पष्टच बोलले

मुंबई तक

ADVERTISEMENT

ajit pawar reaction on vijay shivtare eknath shinde baramati lok sabha election 2024 supriya sule ve sunetra pawar
शिवतारेंच्या बंडखोरीने फटका बसेल याबाबत मला आता सांगता येणार नाही
social share
google news

Ajit Pawar Reaction Vijay Shivtare : रायचंद शिंदे, शिरूर :  बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार आहे. मात्र शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी लोकसभा लढणार असल्याची भूमिका घेत अजित पवारांची अडचण वाढवली होती. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवतारेंची बैठक पार पडली होती. मात्र या बैठकीनंतर देखील शिवतारे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. असे असताना ''आम्हीही आरेला कारे करु शकतो मात्र वातावरण खराब न करता निवडणूकीला सामोरे जायचेच, असे म्हणत अजित पवारांनी विजय शिवतारेंना सुनावले आहे. (ajit pawar reaction on vijay shivtare eknath shinde baramati lok sabha election 2024 supriya sule ve sunetra pawar) 

शिरुर लोकसभा मतदारसंघासंदर्भात अजित पवारांची खेडमध्ये बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अजित पवारांनी शिवतारेंवर प्रतिक्रिया दिली. शिवतारेंच्या बंडखोरीने फटका बसेल याबाबत मला आता सांगता येणार नाही, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यामध्ये लक्ष घालुन शिवतारेंना आवाहन केले आहे. आता शिवतारेंनी नेतृत्वाचे ऐकायचे कि नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र आम्हाला वातावरण खराब करायचे नाही. आम्हीही आरेला कारे करु शकतो मात्र वातावरण खराब न करता निवडणूकीला सामोरे जायचे असं म्हणत अजित पवारांनी शिवतारेंना सुनावले आहे. 

हे ही वाचा : MNS BJP Alliance : राज ठाकरेंची एन्ट्री, महायुतीत कुणाची जाणार विकेट?

दरम्यान बारामती लोकसभा मतदार संघातून विजय शिवतारे निवडणूक लढवणार आहेत. यावर अजित पवार मिश्किलपणे म्हणाले मला माहिती पण तुम्हाला निवडणूक लढवायची असेल तर तुम्हीही उभे राहू शकता शेवटी संविधानाने प्रत्येकाला तो आधिकार आहे. तसेच शिवतारे म्हणतात अजितदादात माणुसकी नाही तर अजितदादा म्हणाले लोकं ठरवतील माणुसकी कुणामध्ये आहे, असे वाक्यात उत्तर त्यांनी दिले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विजय शिवतारे काय म्हणाले? 

दरम्यान आज विजय शिवतारे यांनी भोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे नेते अनंतराव थोपटे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी थोपटेंना पाठिंबा देण्याचे आवाहन केले. यावेळी टीव्ही 9 मराठीशी बोलताना शिवतारे म्हणाले की, "माझी अजित पवारांवर नाराजी नाही. माझ्या मतदारसंघामधील लोकांची नाराजी आहे. २०१९ च्या सांगता सभेमध्ये ते (अजित पवार) म्हणालेले की, मरतोय तर कशाला लढतोय? मेला तर पुन्हा बाय इलेक्शन होईल. मी हे विसरलोय, नियती त्यांना पाहून घेईन. मतदारसंघातील स्वाभिमानी मतदार मात्र हे विसरणार नाही. मला त्यांनी फोन करावा असी माझी इच्छा नाही."

हे ही वाचा : Ahmednagar Lok Sabha : सुजय विखेंविरुद्ध राष्ट्रवादी 'या' नेत्याला उतरवणार मैदानात!

शिवतारे असंही म्हणाले की, "पवार ही प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीने इतरांना दाबून ठेवलेले आहे. इतरांना काम करण्याची संधी दिली पाहिजे. त्या विरोधात माझा लढा आहे. बारामतीतील मतदारांना तिसरा पर्याय दिला पाहिजे, यासाठी ज्यांनी प्रयत्न केले. त्यांना भेटणं, विश्वासात घेणं, मुख्यमंत्र्यांच्या भावना त्यांना कळवणं. या सगळ्यात, जनतेचा निर्णय महत्त्वाचा आहे", असे शिवतारेंनी थोपटेंच्या भेटीनंतर सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT