Lok Sabha Election 2024 : बारामतीत फडणवीसांची मोठी खेळी, पवारांविरूद्ध 'ही' रणनिती आखणार
Baramati Loksabha election 2024, Devendra Fadnavis : बारामती लोकसभा मतदारसंघात तीन वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी लढत होणार आहे. त्यामुळे बारामतीत पवार विरूद्द पवार लढत होणार आहे.
ADVERTISEMENT
Baramati Loksabha election 2024, Devendra Fadnavis : बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे विरूद्द सुनेत्रा पवार म्हणजेच पवार विरूद्ध पवार अशी लढत होणार आहे. या मतदार संघात शरद पवारांची ताकद खूपच मोठी आहे. त्यामुळे या ताकदीला टक्कर देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मोठी खेळी करण्याच्या तयारी केली आहे. यासाठी फडणवीसांनी ही लढत पवार विरूद्द पवार नसून नरेंद्र मोदी (Narendra Modi) विरूद्ध राहुल गांधी (Rahul Gandhi) असल्याचा नरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या नरेटीव्हद्वारे पवांराचा उमेदवार पाडण्याची नेमकी खेळी काय असणार आहे? हे जाणून घेऊयात. ( baramati loksabha election 2024 supriya sule vs sunetra pawar ajit pawar Devendra fadnavis sharad pawar maharashtra politics)
ADVERTISEMENT
बारामती लोकसभा मतदारसंघात तीन वेळा खासदार राहिलेल्या सुप्रिया सुळे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी लढत होणार आहे. त्यामुळे बारामतीत पवार विरूद्द पवार लढत होणार आहे. मात्र ही लढाई पवार विरूद्द पवार नसून नरेंद्र मोदी विरूद्ध राहुल गांधी होणार असल्याचे विधान देंवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले होते.
हे ही वाचा : BJP हा एकमेव पक्ष ज्यामध्ये कधीही फूट पडली नाही: फडणवीस
देवेंद्र फडणवीसांच्या या विधानाने त्यांनी ही लढाई वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे. यामागचे कारण म्हणजे बारामतीत ही लढाई पवार विरूद्ध पवार झाली तर महायुतीला पराभवाचा धोका अधिक असण्याची शक्यता आहे. कारण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवारांना खूप सहानुभूती मिळते. पवार कुटुंब देखील त्यांच्याच बाजून उभे आहे. त्यामुळे पवारांच्या मागे असलेल्या सहानुभूतींचे मतात परिवर्तन झाले, तर त्यांना निवडणूकीत मोठा फायदा होऊ शकतो. याच कारणामुळे देवेंद्र फडणवीसांनी ही लढाई वेगळ्या दिशेने वळवली.
हे वाचलं का?
तसेच फडणवीसांच्या खेळीनुसार जर बारामतीत नरेंद्र मोदी विरूद्द राहुल गांधी लढाई असल्याचे नरेटीव्ह आखल्यास, पवारांचा सहानुभूती फॅक्टर चालणार नाही आहे. स्थानिक मुद्देही वगळण्यात येतील. महायुतीकडून राष्ट्रीय स्तरावरील मुद्यावरून महाविकास आघाडीला टार्गेट करण्यात येईल. ज्यामध्ये मोदींच्या नावाने प्रचार केल्यास महायुतीचे पारडे वजनदार होईल आणि निवडणुकीत याचा महायुतीला फायदा होईल.
हे ही वाचा : शिंदेंचं टेन्शन वाढणार, गणपत गायकवाडांच्या ऑफिसमध्ये काय घडलं?
अजित पवारांसाठी विजय महत्वाचा
बारामती लोकसभा मतदार संघात अजित पवारांना जिंकणे खूप महत्वाचे आहे. कारण निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना मिळालं आहे. पण आता शरद पवारांचा बालेकिल्ला अजित पवारांना खेचून आणताय येतोय? हे या निवडणुकीत त्यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे हे आव्हान त्यांना पेलवणार का? हे निकालानंतर कळणार आहे.
ADVERTISEMENT
स्थानिक मुद्दे आणि पवार विरूद्द पवार लढतीने निवडणूकीला सामोरे गेल्यास महायुतीला बारामतीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेऊन फडणवीसांनी ही रणनिती आखली आहे. आता फडणवीस या खेळीत किती यशस्वी होतात हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT