Lok Sabha Election 2024 : "ठाकरे-पवारांना याची उत्तरे द्यावी लागतील", भाजपने ठेवलं मुद्द्यावर बोट

मुंबई तक

ADVERTISEMENT

bjp keshav upadhyay criticize india alliance delhi ramlila maidan maharally arvind kejriwal lok sabha election 2024
देश लुटणारे दिल्लीतल्या मेळाव्यात एकत्र आले होते
social share
google news

Keshav Upadhyay criticize india alliance  maharally : इंडिया आघाडीच्या नेत्यांनी रविवारी दिल्लीतील रामलीला मैदानावर महारॅली घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीकास्त्र डागलं होतं. या टीकेला भाजपकडून आता प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ''देश लुटणारे दिल्लीतल्या मेळाव्यात एकत्र आले होते, त्यामुळे हा भ्रष्टाचाराचा मेळावा असल्याचा टोला आता भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (Keshav Upadhyay) यांनी इंडिया आघाडीला   i(ndia alliance) लगावला आहे. (bjp keshav upadhyay criticize india alliance delhi ramlila maidan maharally arvind kejriwal lok sabha election 2024) 

केशव उपाध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांनी इंडिया आघाडीच्या दिल्लीतील महारॅलीवर जोरदार टीका केली. ''इंडी आघाडीच्या दिल्लीतल्या महामेळाव्यात देश लुटण्याचा आरोप असणारे अनेक नेते एकत्र आले होते. यामध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनीही उपस्थिती लावली होती. त्यामुळे रविवारी पार पडलेला इंडी आघाडीचा हा भ्रष्टाचार्‍यांचा महामेळावा होता. या महामेळ्यात सहभागी झालेल्या नेतेमंडळींनी किती प्रयत्न केले तरी त्यांच्यावर कारवाई होणारच आहे. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील भ्रष्टाचार निपटून काढण्याचा निर्धार केला आहे,असे केशव उपाध्ये यांनी सांगितले आहे. 

हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : माढ्यात नवा ट्विस्ट; शरद पवारांचा उमेदवार ठरला?

उपाध्ये पुढे म्हणाले की, महामेळाव्यात इंडी आघाडीने मात्र ‘भ्रष्टाचारी बचाव’ असा नारा देऊन आपले खरे रूप देशाला दाखवले आहे. त्यामुळे इंडी आघाडीच्या नेत्यांनी कितीही कांगावा केला तरी न्यायव्यवस्थेने त्यांच्यावरच्या आरोपांना पुष्टी दिली आहे. त्यामुळे नेतेमंडळींना लोकसभा निवडणुकीत आपापल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर मतदारांना उत्तरे द्यावी लागणार आहेत,असे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान यावेळी उपाध्ये यांनी इंडी आघाडीतील प्रमुख नेत्यांवर असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पाढा देखील वाचून दाखवला. अरविंद केजरीवाल, हेमंत सोरेन, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, खा.संजय सिंह या मंडळींना न्यायालयाने जामीन देण्यास नकार दिला आहे.यावरूनच त्यांचा घोटाळ्यातील सहभाग सिद्ध होतो. 

हे ही वाचा : "संज्या, नटरंगी नाच्या...", भाजप आमदार राऊतांवर प्रचंड संतापला

सोनिया गांधी, राहुल गांधी, लालूप्रसाद यादव यांच्यावरही भ्रष्टाचाराचे खटले चालू आहेत.  तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यात कोरोना काळात अनेक घोटाळे घडले. दिल्लीमध्ये घडलेला मद्य घोटाळा महाराष्ट्रातही करण्याची तयारी ‘मविआ’ सरकारच्या काळात चालू होती का, याची उत्तरे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आगामी काळात द्यावी लागणार आहेत, असे देखील केशव उपाध्ये यांनी सांगितले आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT