Maharashtra Lok Sabha : शांतिगिरी महाराजांवर गुन्हा! तहसीलदाराची तक्रार काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

case register against shantigiri maharaj voilation of code of conduct nashik lok sabha constituency
शांतिगिरी महाराज यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
social share
google news

Shantigiri Maharaj, Nashik Lok Sabha : प्रविण ठाकरे, नाशिक : लोकसभेचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांना EVM मशिनला हार घालणे चांगलच महागात पडलं आहे. कारण शांतिगिरी महाराज यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला होता. या प्रकरणी तहसीलदाराने (Tahsildar) तक्रार दाखल केल्यानंतर शांतिगिरी महाराजांविरूद्द (Shantigiri Maharaj) गुन्हा (Case) दाखल करण्यात आला आहे.  (case register against shantigiri maharaj voilation of code of conduct nashik lok sabha constituency)

शांतिगिरी महाराज यांनी आज त्र्यंबकेश्ववर मतदान केंद्रावर मतदान केलं होतं. यावेळी शांतिगिरी महाराज यांनी मतदान केंद्रावर EVM मशिनला हार घातला होता. तसेच यंत्राला नमस्कार करून मंत्रही म्हटले होते. शांतिगिरी महाराजांच्या या कृतीवर त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार ठकाजी वामन महाले यांनी आक्षेप घेत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर शांतिगिरी महाराज यांच्यावर आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हे ही वाचा : Sharad Pawar : "भाजप अशीच भूमिका राष्ट्रवादी-शिवसेनेबद्दल घेईल"

ईव्हिएम मशीनला हार घातल्याच्या घटनेवर आक्षेप घेत तहसीलदार ठकाजी वामन महाले यांनी शांतिगिरी महाराज यांच्याविरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीत महाले यांनी ईव्हिएम मशीनला हार घालून गैरवर्तवणूक केल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी शांतिगिरी महाराज यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाले यांनी केली होती. या तक्रारीनंतर शांतिगिरी महाराज यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कलम 186, कलम 188, कलम 131 आणि कलम 132 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे ईव्हिएम मशीनला हार घालणं शांतिगिरी महाराजांना चांगलचं भोवलं आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर आता शांतिगिरी महाराज यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय,   आम्ही मतदानाच्या यंत्राला हार घातला नाही. हार पुठ्याला घातला आहे. त्या पुठ्यावर भारत मातेचा फोटो होता. कव्हरवर भारत मातेचं चित्र होतं.म्हणून त्या भारत मातेला आम्ही हार चढवला. पुजा केली नाही, असे शांतिगिरी महाराज यांनी म्हटलं आहे. या गुन्ह्याला आता आमची कायदेशीर टीम उत्तर देईल, असे शांतिगिरी महाराज यांनी म्हटलं आहे. 

हे ही वाचा : बारावीच्या निकालाची तारीख ठरली, कुठे आणि कसा पाहायचा निकाल?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT