Abhay Patil : आंबेडकरांना अकोल्यात आव्हान देणारे काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील कोण ?

मुंबई तक

ADVERTISEMENT

congress declare akola lok sabha candidancy dr abhay patil prakash ambedkar anup dhote fight maha vikas aghadi
काँग्रेसने अकोला लोकसभा मतदार संघातून डॉ.अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
social share
google news

Who is Dr. Abhay Patil : धनंजय साबळे, अकोला : काँग्रेसने अकोला लोकसभा मतदार संघातून डॉ.अभय पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ही उमेदवारी जाहीर होताच वंचित आणि महाविकास आघाडीची यूती तुटल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता अकोल्यात भापज खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे, वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. दरम्यान  अकोल्यातून काँग्रेसने ज्या डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी दिली आहे. ते नेमके कोण आहेत? हे जाणून घेऊयात.

कोण आहेत अभय पाटील? 

डॉ. अभय पाटील यांचा जन्म 20 जानेवारी 1965 रोजी झाला आहे. 

डॉ. अभय पाटील यांनी (एम.बी.बी.एस. ऑर्थोपेडीक सर्जन) (एफ.सी.पी.एस. ऑर्थोपेडीक सर्जन) आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

डॉ. अभय पाटील हे अस्थिरोगतज्ज्ञ आहेत. यापुर्वी ते शासकीय सेवेतही होते. 

हे ही वाचा : ठाकरेंना चीतपट करण्यासाठी अजितदादांच्या मनात वेगळाच डाव

गेल्या 30 वर्षापासून अकोल्यात अर्थोपेडीक सर्जन म्हणून प्रॅक्टिस करत आहे. 
      
डॉ. अभय पाटील हे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आहेत. 

ADVERTISEMENT

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस पद अभय पाटील यांच्याकडे आहे.

ADVERTISEMENT

अभय पाटील हे अकोला आणि वाशिम मध्ये मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक आहेत. अकोल्यात सामजिक कार्य करण्यात ते नेहमीच अग्रेसर असतात. तसेच पाटील हे धार्मिक वृत्तीचे आहेत. ते अकोल्यातील प्रत्येक धार्मिक उत्सवात नेहमी सहभागी होत असतात. त्यांनी वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून अनेक गरजू रूग्णांना मदत केली आहे. गावागावांत त्यांनी वैद्यकीय शिबिरे घेऊन  रुग्णसेवा केली आहे. 
   
 अकोल्यातील ऐतिहासित कावड महोत्सव, गुढीपाडवा उत्सव आदी धार्मिक सामाजिक उपक्रमात ते नेहमी सहभागी होत असतात. मराठा मोर्चात त्यांनी झोकून काम केले आहे. मराठा क्रांती मोर्चाचे ते समन्वयक आहेत. 

हे ही वाचा : Vijay Shivtare : 'महाविकास आघाडीच पलटूरामांचा मेळावा...,'

काँग्रसने आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला खिंडार पाडण्यासाठी मराठा कार्ड वापरण्याची रणनिती आखली आहे. त्यामुळे काँग्रेसचे हे मराठा कार्ड किती यशस्वी ठरते. हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT