Maha Vikas Aghadi : 'मविआ'मध्ये ठिणगी! पटोले, थोरात बैठकीतून का गेले निघून?
Maha Vikas Aghadi Meeting : शरद पवार यांच्या घरी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीतून काँग्रेस नेते गेले उठून.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
तीन जागांवरून महाविकास आघाडीत तिढा
शरद पवारांच्या घरी झाली बैठक
काँग्रेस नेते मविआच्या बैठकीतून गेले निघून
Maha Vikas Aghadi Seat Sharing : महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शरद पवार यांच्या घरी तिन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. मात्र, या बैठकीत सांगलीच्या जागेवरून ठिणगी पडली. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात सुरू असलेल्या बैठकीतून निघून गेले, अशी माहिती सूत्रांनी दिली. (Congress leaders walkout from Maha Vikas Aghadi meeting)
ADVERTISEMENT
लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा तोंडावर आलेला असतानाही महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा गुंता सुटलेला नाही. तीन लोकसभा मतदारसंघावरून तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच आहे. यात सांगलीची जागा कळीची ठरली आहे.
दरम्यान, ज्यामुळे जागावाटपाची घोषणा रखडली आहे, त्यावर जागांसंदर्भात चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बुधवारी (3 मार्च) रात्री बोलवण्यात आली होती. पण, या बैठकीत तोडगा निघण्याऐवजी मुद्दा आणखी चिघळला आहे.
हे वाचलं का?
सिल्व्हर ओकवर काय झाल, वाचा Inside Story
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या जागांवर पेच निर्माण झाला आहे, त्यावर चर्चा करताना मविआतील नेत्यांमध्ये खडाजंगी झाली. मिळालेल्या माहितीनुसार सांगली लोकसभा मतदारसंघावरील दावा सोडायला काँग्रेस तयार नाही. बैठकीत काँग्रेस नेत्यांचा आवाज चांगलाच वाढला होता.
हेही वाचा >> "उमेदवारी जाहीर करायला नको होती", हेमंत पाटलांनी व्यक्त केली खदखद
सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेस नेत्यांनी सांगली, भिवंडी आणि मुंबईतील एक जागा सोडायला नकार दिला. दुसरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सांगली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भिवंडी या जागांवरील दावा सोडायला तयार झाले नाही.
ADVERTISEMENT
बैठकीत तिन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये जागावाटपाच्या चर्चेदरम्यान खडाजंगी झाली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे बैठकीतून निघून गेले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> शिंदेंनी तिकीट कापल्यानंतर भावना गवळींचा मोठा निर्णय, उमेदवारी अर्ज...
दिल्लीतील पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतरच आम्ही पुढील निर्णय घेऊ, असे सांगत पटोले आणि थोरात हे बैठक सोडून निघून गेले, अशी माहिती सूत्रांनी दिली.
काँग्रेस आक्रमक
मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेसने महाविकास आघाडीच्या संयुक्त प्रचारात सहभागी होण्याबद्दलही वेट अॅण्ड वॉच भूमिका घेतली आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीत असलेल्या ठाकरेंच्या सेनेने 21 जागांवरील उमेदवार जाहीर केले आहेत. दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 5, तर काँग्रेसने 13 उमेदवार जाहीर केले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT