Dharashiv Lok Sabha Election 2024 : निंबाळकरांसमोर अजित पवारांनी उतरवला उमेदवार, कोण आहेत अर्चना पाटील?
Archana Patil NCP Dharashiv Candidancy : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्चना पाटील यांना धाराशिवमधून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे धाराशिव मतदार संघात आता अर्चना पाटील विरूद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत होणार आहे.
ADVERTISEMENT
Archana Patil NCP Dharashiv Candidancy : भापजचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अर्चना पाटील यांना धाराशिवमधून उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे धाराशिव मतदार संघात आता अर्चना पाटील विरूद्ध ओमराजे निंबाळकर अशी लढत होणार आहे. त्यामुळे निंबाळकरांविरूद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरणाऱ्या अर्चना पाटील नेमक्या कोण आहेत? हे जाणून घेऊयात. ( dharashiv lok sabha election archana patil join ajit pawar ncp get dharashiv candidancy udhhav thackeray candidate omraje nimbalakar)
ADVERTISEMENT
धाराशीवच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार कोण?
अर्चना पाटील यांचा जन्म 29 जुलै 1971 रोजी झाला आहे. त्यांनी पुण्याच्या विद्यापीठातून बी.ई. इलेक्ट्रॉनिक्सची पदवी घेतली आहे.
अर्चना पाटील या धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा आहेत.
हे वाचलं का?
लेडीज क्लब या संघटनेच्या अर्चना पाटील अध्यक्षा आहेत. ही संघटना महिलांसाठी जिल्ह्यात काम करते.
हे ही वाचा : अजित पवार गटाची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली, काय दिले आदेश?
तुळजापूरचे भापज आमदार राणाजगजितसिंग पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.
ADVERTISEMENT
अर्चना पाटील यांनी 2012 साली राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील केशेगाव जिल्हा परिषद विक्रमी मतांनी जिंकली होती.
ADVERTISEMENT
2017 मध्ये त्या धाराशीव जिल्ह्यातील तेर जिल्हा परिषद गटातून त्या विजयी झाल्या होत्या. याच कार्यकाळात त्यांनी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळली होती.
अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण आणि आरोग्य सभापती पदाचा पदभार सांभाळत शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोलाची कामगिरी बजावली.
हे ही वाचा : काँग्रेसने भिवंडीची जागाही गमावली, पवारांनी जाहीर केला उमेदवार
अर्चना पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्राथमिक उपकेंद्राचे जिल्हाभरात जाळे निर्माण केले. अंगणवाडी सेविका आणि आशा कार्यकर्त्यांच्या मानधन वाढीसाठी विशेष प्रयत्न केले.
ओमराजे निंबाळकर आणि राणा जगजितसिंह पाटील म्हणजेच पाटील विरूद्ध निंबाळकर संघर्ष धाराशिव जिल्ह्याला नवीन राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर हे रिंगणार आहेत. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अर्चना पाटील या महायुतीच्या उमेदवार असणार आहे. त्यामुळे पारंपारीक प्रतिस्पर्धी असलेली दोन घराणी आता लोकसभेच्या रिंगणात पुन्हा एकदा समोरा समोर येणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT