Shiv Sena : शिंदेंच्या दोन खासदारांचा 'गेम'; आधी दिले तिकीट, आता बदलणार उमेदवार?

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

शिवसेनेने जाहीर केलेले दोन उमेदवार बदलावे, असे भाजपकडून सांगण्यात आले आहे.
भाजपने शिंदेंना दोन उमेदवारांना बदलण्यास सांगितले आहे.
social share
google news

Shiv Sena Candidate, dhairyashil mane, hemant patil : शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या अनेक खासदारांवर उमेदवारी गमावण्याची वेळ आली आहे. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापल्यानंतर आता आणखी तीन खासदारांची उमेदवारी धोक्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्यांना तिकिटं देण्यात आली आहेत, त्यांना बदलण्यात यावे, असे भाजपने शिंदेंना सांगितले आहे. त्यामुळे खासदारांमध्ये अस्वस्थता आहे. (BJP Asked to eknath Shinde to replace two of his declared candidates)

महायुतीमध्ये जागावाटप आणि उमेदवार ठरवण्यावरून प्रचंड घमासान सुरू आहे. महायुतीच्या जागावाटपाचा पेच अजूनही सुटलेला नाही. दुसरीकडे आता एकनाथ शिंदे यांना जाहीर केलेल्या उमेदवारांपैकी दोन उमदेवारांना बदलण्यास भाजपने सांगितले आहे. 

एकनाथ शिंदेंच्या कोणत्या खासदारांचे तिकीट धोक्यात?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मावळ - श्रीरंग बारणे
हिंगोली - हेमंत पाटील
बुलडाणा - प्रतापराव जाधव
दक्षिण-मध्य मुंबई - राहुल शेवाळे
रामटेक - राजू पारवे
हातकणंगले - धैर्यशील माने
कोल्हापूर - संजय मंडलिक
शिर्डी - सदाशिव लोखंडे

शिंदेंच्या शिवसेनेने आठ जागांसाठी उमेदवार जाहीर केले, पण त्यातील दोन उमेदवार बदलावे लागणार आहेत, तसे भाजपने सांगितले असल्याचे सूत्रांनी सांगितले. जाहीर केलेल्या यादीत शिंदेंनी रामटेकमध्ये विद्ममान खासदाराचा तिकीट कापून काँग्रेस नेत्याला उमेदवारी दिली.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "उमेदवार बदलण्यासाठी भाजपचा एकनाथ शिंदेंवर दबाव", शिवसेनेच्या नेत्याच्या विधानाने खळबळ

आता हिंगोली आणि हातकणंगले या दोन मतदारसंघातील उमेदवार बदलले जाणार, अशी माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यमान खासदार धैर्यशील माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, पण त्यांच्याऐवजी त्यांच्या आई निवेदिता माने यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी सूचना भाजपने केली आहे.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाजपला झटका! विद्यमान खासदार ठाकरेंच्या सेनेत करणार प्रवेश 

दुसरीकडे हिंगोलीमधून उमेदवारी जाहीर झालेल्या विद्ममान खासदार हेमंत पाटील यांचंही नाव या यादीत आहे. हेमंत पाटील यांनी हिंगोलीतून माघार घ्यावी आणि त्यांच्या पत्नीने यवतमाळ-वाशिम मतदारसंघातून निवडणूक लढवावी असा प्रस्ताव आहे. राजश्री पाटील यांना शिवसेनेने यवतमाळमधून उमेदवारी द्यावी, अशी सूचना भाजप पक्षश्रेष्ठीने शिंदेंना केली आहे.

 

भावना गवळी, हेमंत गोडसेंचा पत्ता कट?

शिंदेंच्या विद्ममान खासदारांपैकी अनेकांचे पत्ते कट होणार असल्याची चर्चा आधीपासून सुरू होती. त्यावर हळूहळू शिक्कामोर्तब होताना दिसत आहे. नाशिकमधून हेमंत गोडसे हे शिवसेनेचे विद्ममान खासदार आहेत, पण त्यांच्याऐवजी छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाणार आहे. दिल्लीतून भुजबळांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचे सूत्रांकडून कळते.

हेही वाचा >> 'पवारांच्या नावावर मतं मागण्याचे दिवस गेले...', आढळरावांचं मोठं विधान 

दुसरी बाब म्हणजे विद्ममान खासदार भावना गवळी यांचाही पत्ता कट होणार, हे निश्चित मानलं जात आहे. भावना गवळी यांच्या मतदारसंघातून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांनी तिकीट देण्यात यावे, अशी सूचना भाजपकडून करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदेंसमोर मोठे पेच निर्माण झाले आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT