Lok Sabha election 2024 : ठाकरेंची लढाई शिंदेंच्या नेत्याने केली सोपी; भाजपची झाली अडचण?

भागवत हिरेकर

Gajanan Kirtikar on Amol Kirtikar and lok Sabh election 2024 : गजानन कीर्तिकर यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे अमोल कीर्तिकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर प्रश्न उपस्तित झाले आहेत.

ADVERTISEMENT

Mumbai North West Lok Sabha constituency : लोकसभा निवडणुकीत राजकारण बदलणार?
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील राजकारण काय?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघ निवडणूक २०२४

point

गजानन कीर्तिकर यांच्यामुळे अमोल कीर्तिकर यांना दिलासा

point

महायुतीची प्रचार करताना होणार पंचाईत?

Amol Kirtikar, Mumbai North West Lok Sabha Constituency Latest News : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने अमोल कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या नावाची घोषणा होताच ईडीचे समन्स त्यांना आले आणि अमोल कीर्तिकर खिचडी घोटाळ्यात फसणार अशी चर्चा सुरू झाली. पण, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते गजानन कीर्तिकर यांनी अमोल कीर्तिकर यांना क्लिनचीट देत ठाकरेंची लढाई सोपी केली आहे. ती कशी समजून घ्या... (Big Relife to Gajanan Kirtikar Revealed facts of Khichadi scam)

शिवसेनेत फूट पडली. खासदार गजानन कीर्तिकर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले. पण, त्यांचे सुपूत्र अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरे यांच्याच पक्षात राहिले. अमोल कीर्तिकर यांचे नाव कथित खिचडी घोटाळ्यात जोडण्यात आले. 

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अमोल कीर्तिकर सूरज चव्हाण यांच्यावर आरोप करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी कीर्तिकरांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर ईडीने या प्रकरणात कीर्तिकरांना समन्स बजावले आणि त्यांची आठ तास चौकशीही केली. याच प्रकरणात उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले संजय निरुपम यांनीही अमोल कीर्तिकरांवर खिचडीचोर, लाचखोर असे आरोप केले. पण, या सगळ्यात गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या खुलाशाने भाजप आणि महायुतीच अडचणीत आली आहे. 

कीर्तिकर काय म्हणाले ते आधी बघा...

खिचडी घोटाळ्यात पैसे घेतल्याचा आरोप अमोल कीर्तिकरांवर आहे. त्याबद्दल गजानन कीर्तिकर म्हणाले, "आता अमोलवर काय आरोप आहे? अमोलवर आरोप असा आहे की खिचडी पुरवठा करणारी जी कंपनी आहे, त्याची स्थापना केली आहे संजय माशेलकरने. कोविड काळात ते लोकं सामाजिक कार्य करत होते."

हे वाचलं का?

    follow whatsapp