India Today-Axis My India Exit Poll : शिंदेंची शिवसेना महाराष्ट्रात 'या' जागा जिंकणार? पाहा यादी एका क्लिकवर

मुंबई तक

ADVERTISEMENT

india today axis my india exit poll 2024 maharashtra lok sabha eknath shinde led shiv sena how many seat win in maharashtra exit poll 2024
लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे.
social share
google news

India Today-Axis My India Exit Poll Eknath Shinde Shiv Sena : लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या निकालाआधी एक्झिट पोल (Exit Poll 2024) समोर आले आहेत. या एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 10 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आता या 10 जागांवर शिंदे नेमक्या कोणत्या जागा जिंकतायत आणि त्यांचा कोणता उमेदवार जिंकतोय. हे जाणून घेऊयात. (india today axis my india exit poll 2024 maharashtra lok sabha eknath shinde led shiv sena how many seat win in maharashtra exit poll 2024) 

ADVERTISEMENT

खरं तर लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) गद्दार विरूद्ध निष्ठावंतात लढाई असल्याची घोषणा केली होती. त्यात ठाकरेंची शिवसेना फोडल्यानंतर त्यांच्यामागे सहानुभूतीची लाट होती. अशा परिस्थितीत शिंदेंच्या शिवसेनेचा या लाटेसमोर निभाव लागले का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र आता एक्झिट पोलनुसार एकनाथ शिंदे यांची शिवसेना महाराष्ट्रातील 10 जागांवर जिंकत असल्याचा अंदाज आहे. आता या 10 जागा कोणत्या आहेत? ते जाणून घेऊयात. 

India Today-Axis My Exit Poll नुसार एकनाथ शिंदेंची शिवसेना महाराष्ट्रातील कोणकोणत्या जागा जिंकणार?

शिर्डी - सदाशिव लोखंडे  (शिवसेना शिंदे गट)
हिंगोली - बाबूराव कदम-कोहळीकर (शिवसेना शिंदे गट)
कल्याण - श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट)
ठाणे - नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
 बुलढाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)
छ. संभाजीनगर - संदिपान भुमरे (शिवसेना शिंदे गट)
हातकणंगले - धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट)
मुंबई उत्तर पश्चिम - रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)
रामटेक - अशोक पारवे (शिवसेना शिंदे गट)
 कोल्हापूर - संजय मंडलिक (शिवसेना शिंदे गट)

हे वाचलं का?

Exit Poll नुसार, महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघात कोणता उमेदवार विजयी होणार?

1. नंदूरबार - हिना गावित (भाजप)
2. दिंडोरी - भारती पवार (भाजप)
3. जळगाव - स्मिता वाघ (भाजप)
4. धुळे - सुभाष भामरे (भाजप)
5. रावेर - रक्षा खडसे (भाजप)
6. नाशिक - राजाभाऊ वाजे (शिवसेना ठाकरे गट)
7. शिर्डी - सदाशिव लोखंडे  (शिवसेना शिंदे गट)
8. अहमदनगर - सुजय विखे (भाजप)
9. हिंगोली - बाबूराव कदम-कोहळीकर (शिवसेना शिंदे गट)
10. कल्याण - श्रीकांत शिंदे (शिवसेना शिंदे गट)
11. ठाणे - नरेश म्हस्के (शिवसेना शिंदे गट)
12. बुलढाणा - प्रतापराव जाधव (शिवसेना शिंदे गट)
13. मावळ - संजोग वाघेरे (शिवसेना ठाकरे गट)
14. यवतमाळ - संजय देशमुख (शिवसेना ठाकरे गट) 
15. छ. संभाजीनगर - संदिपान भुमरे (शिवसेना शिंदे गट)
16. हातकणंगले - धैर्यशील माने (शिवसेना शिंदे गट)
17. लातूर - सुधाकर श्रृंगारे (भाजप)
18. धाराशिव - ओमराजे निंबाळकर (शिवसेना ठाकरे गट)
19. परभणी - संजय जाधव (शिवसेना ठाकरे गट)
20. बीड - पंकजा मुंडे (भाजप)
21. नांदेड - वसंतराव चव्हाण (काँग्रेस)
22. जालना - रावसाहेब दानवे (भाजप)
23. मुंबई उत्तर - पियूष गोयल (भाजप)
24. मुंबई उत्तर मध्य - उज्ज्वल निकम (भाजप)
25. मुंबई उत्तर पूर्व - संजय दिना पाटील (शिवसेना ठाकरे गट) 
26. मुंबई उत्तर पश्चिम - रवींद्र वायकर (शिवसेना शिंदे गट)
27. मुंबई दक्षिण मध्य - अनिल देसाई (शिवसेना ठाकरे गट) 
28. दक्षिण मुंबई - अरविंद सावंत (शिवसेना ठाकरे गट)
29. नागपूर - नितीन गडकरी (भाजप)
30. अमरावती - नवनीत राणा (भाजप)
31. अकोला - अनुप धोत्रे (भाजप)
32. वर्धा - रामदास तडस (भाजप)
33. गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप)
34. रामटेक - अशोक पारवे (शिवसेना शिंदे गट)
35. चंद्रपूर - प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
36. भंडारा-गोंदिया - सुनील मेंढे (भाजप)
37. माढा - रणजीतसिंह नाईक-निंबाळकर (भाजप)
38. पुणे - मुरलीधर मोहोळ (भाजप)
39. सांगली - विशाल पाटील (अपक्ष)
40. शिरूर - अमोल कोल्हे (NCP शरद पवार)
41. बारामती - सुप्रिया सुळे (NCP शरद पवार)
42. सातारा - उदयनराजे भोसले (भाजप)
43. कोल्हापूर - संजय मंडलिक (शिवसेना शिंदे गट)
44. सोलापूर - प्रणिती शिंदे (काँग्रेस)
45. रायगड - सुनील तटकरे (NCP अजित पवार)
46. भिवंडी - सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) (NCP शरद पवार)
47. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नारायण राणे (भाजप)
48. पालघर - हेमंत सावरा (भाजप)

मविआ-महायुतीला किती जागा? 

India Today-Axis My India एक्झिट पोलनुसार, महायुतीला आघाडीला राज्यात 48 पैकी तब्बल 28 ते 32 जागा मिळू शकतील. ज्यामध्ये भाजपला तब्बल 20 ते 22, शिवसेना (शिंदे गट) 8 ते 10 आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला 1 ते 2 जागांवर उमेदवार विजयी होऊ शकतात.तर महाविकास आघाडीला राज्यात 48 पैकी तब्बल 16 ते 20 जागा मिळू शकतील. ज्यामध्ये शिवसेना (UBT)पक्षाला 9 ते 11, काँग्रेसला 3 ते 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 3 ते 5 जागांवर उमेदवार विजय मिळवू शकतात.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT