Lok Sabha 2024: BJP ची महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची संपूर्ण यादी, मोदी-शाहांच्या मनात नेमकं काय?

रोहित गोळे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

BJP 2nd list Lok Sabha election 2024: नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक 2024 साठी भारतीय जनता पक्षाने त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी 72 उमेदवारांची नावं घोषित केली आहे. पहिल्या यादीत भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. भाजपने जी दुसरी यादी जाहीर केली आहे त्यात महाराष्ट्रातील एकूण 20 जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. ज्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नेत्यांच्या नावाच समावेश आहे.(lok sabha election 2024 bjp 2nd list declared maharashtra 20 candidates )

ADVERTISEMENT

भाजपने महाराष्ट्राच्या पहिल्या यादीत नितीन गडकरी, पियुष गोयल, पंकजा मुंडे यांच्यासह 20  उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. त्यात 6 नवे चेहरे आहेत, तर 14 जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी दिली आहे.

भाजपने नागपूरमधून नितीन गडकरी, उत्तर मुंबईतून पीयूष गोयल, बीडमधून पंकजा मुंडे, नंदुरबारमधून हिना गावित, धुळ्यातून सुभाष भामरे, जळगावमधून स्मिता वाघ, रावेरमधून रक्षा खडसे, अकोला मतदारसंघातून अनुप धोत्रे, वर्ध्यातून रामदास तडस, चंद्रपूरमधून सुधीर मुनगंटीवार आणि नांदेडमधून प्रतापराव पाटील यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे.

हे वाचलं का?

याशिवाय जालन्यातून रावसाहेब दानवे, दिंडोरीतून भारती पवार, भिवंडीतून कपिल मोरेश्वर पाटील, मुंबई ईशान्यमधून मिहीर कोटेचा, पुण्यातून मुरलीधर मोहोळ, अहमदनगर (अहिल्यानगर) मधून सुजय विखे-पाटील, लातूरमधून सुधाकर तुकाराम श्रृंगारे, माढ्यातून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. तर सांगलीतून संजयकाका पाटील यांना  उमेदवारी दिली आहे.

पाहा महाराष्ट्रातील उमेदवारांची संपूर्ण यादी

 

 

 

1. नंदूरबार (ST राखीव) - हिना गावित 
2. धुळे - सुभाष भामरे 
3. जळगाव - स्मिता वाघ
4. रावेर - रक्षा खडसे 
5. अकोला - अनुप धोत्रे
6. वर्धा - रामदास तडस 
7. नागपूर - नितीन गडकरी
8. चंद्रपूर - सुधीर मुनगंटीवार
9. नांदेड - प्रतापराव पाटील-चिखलीकर
10. जालना - रावसाहेब दानवे 
11. दिंडोरी (ST राखीव) - भारती पवार 
12. भिवंडी - कपिल पाटील
13. मुंबई उत्तर - पियूष गोयल
14. मुंबई उत्तर-पूर्व (ईशान्य मुंबई) - मिहीर कोटेचा 
15. पुणे - मुरलीधर मोहोळ
16. अहमदनगर - सुजय विखे-पाटील 
17. बीड- पंकजा मुंडे
18. लातूर (SC राखीव) - सुधाकर श्रृंगारे
19. माढा - रणजीतसिंह नाईक-निंबाळकर
20. सांगली - संजयकाका पाटील

ADVERTISEMENT

दुसऱ्या यादीत भाजपने 72 जागांवरील उमेदवार केले जाहीर

गुजरात- 7 (यात 5 नवीन चेहरे)
दिल्ली- 2 (2 नवीन चेहरे)
हरियाणा-6 (3 नवीन चेहरे)
हिमाचल प्रदेश- 2 (दोन्ही चेहरे पुन्हा)
कर्नाटक- 20
मध्यप्रदेश- 05 (3 नवीन चेहरे)
उत्तराखंड- 2 (2 नवीन चेहरे)
महाराष्ट्र- 20 (6 नवीन नावे)
तेलंगणा- 6
त्रिपुरा-1

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT