Big Breaking: 'काळजी करू नका प्रीतम ताईला मी नाशिकवरून उभं करेन..', पंकजा मुंडेंची प्रचंड मोठी घोषणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

'प्रीतमला मी नाशिकवरून उभं करेन..', पंकजा मुंडेंची प्रचंड मोठी घोषणा
'प्रीतमला मी नाशिकवरून उभं करेन..', पंकजा मुंडेंची प्रचंड मोठी घोषणा
social share
google news

Panakja Munde on Nashik Pritam Munde: बीड: लोकसभा निवडणूक 2024 साठी नाशिक मतदारसंघात नेमका कोणत्या पक्षाचा आणि कोणता उमेदवार द्यावा याचा पेच हा महायुतीत अद्यापही कायम आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि शिवसेना (शिंदे गट) हे नाशिकच्या जागेसाठी रस्सीखेच करत असताना आज (24 एप्रिल) अचानक भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी नाशिक मतदारसंघाबाबत एक मोठी घोषणा केली आहे. पंकजा मुंडेंनी बीडमधील भर सभेत असं म्हटलं की, 'प्रीतम मुंडेंना मी नाशिकमधून उभं करेन..', पंकजा मुंडेंच्या याच घोषणेने आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (lok sabha election 2024 i will nominate pritam munde for election from nashik constituency bjp leader pankaja munde big announcement)

नाशिकमधील मतदान हे राज्यातील शेवटच्या म्हणजेच पाचव्या टप्प्यात आहे. पण निवडणुकीच्या घोषणेपासूनच या मतदारसंघात महायुतीत काही आलबेल नसल्याचं समोर आलं आहे. नाशिकचे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे सातत्याने त्यांनाच तिकीट मिळावं यासाठी आग्रही आहेत. मात्र असं असताना अचानक छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू झाली होती. ज्याला भुजबळांनी देखील दुजोरा दिला होता. 

मागील काही दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून शिंदे आणि पवार गटात बरीच चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप तरी इथे कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. त्यातच भुजबळ यांनी आपण लढणार नसल्याचं म्हणत त्यांचा दावा मागे घेतला. पण तरीही नाशिकची जागा ही शिंदे गटाला गेली की नाही याबाबत कोणतीही स्पष्टता आली नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> 'तुम्ही आमच्यासाठी काय केले?' भारती पवारांवर मतदार संतापले!

अशातच आज अचानक पंकजा मुंडेंनी आपण नाशिकमधून प्रीतम मुंडेंना उभं करू अशी जाहीर घोषणाच केली. ज्यामुळे आता नाशिकसह महायुतीतील राजकारण देखील बदलू शकतं.  

पाहा बीडमधील सभेत पंकजा मुंडे नाशिकबाबत नेमकं काय म्हणाल्या? 

'आता माझ्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते सर्व समाजाचे हे सहनच करू शकत नाही की, हा निकाल उलटा पडलाय. मरून जातील 10-12 लोकं तर रस्त्यावरच.. कारण एवढं प्रेम त्यांनी केलंय.'

ADVERTISEMENT

'या निवडणुकीत असा मेसेज द्या की, हा बीड जिल्हा हा विकासाच्या बाजूने ठामपणे उभा आहे.. मी यानंतर माझ्यासाठी किंवा माझ्या परिवारासाठी मत मागणार नाही.. पंकजा मुंडेंचा हा जाहीर शब्द आहे..'

ADVERTISEMENT

'प्रीतम ताईंना विस्थापित करणार नाही असा मी शब्द दिला होता. मी नाही ओ... मला नका देऊ, मला नका देऊ.. म्हणूनच सगळीकडे गेले. पण मला आता लक्षात आलं की, ही निवडणूक कशाची आहे ते..' 

'प्रीतम ताईचं काही अडलं नाही.. ताईला मी नाशिकवरून उभं करेन..  तुम्ही काही काळजी करू नका. प्रीतम ताईचं राजकारण हे मुंडे साहेबांच्या पश्चात होतं..'

'मी मुंडे साहेब जिवंत असताना त्यांचा हात बनले होते. एक संधी 5 वर्ष.. कारण पुन्हा मोदीजी पंतप्रधान होणं आणि आपण तिथे जाणं.. येणारए का योग? येणार नाही.. बुद्धी नका करू भ्रष्ट आपली...' 

'सगळ्या कामांसाठी राजकारण्यांकडे जातात आता निवडणुकीत कशाला तुमचा राजकारणावर बहिष्कार आहे. कशाला? नाही करायचा बहिष्कार.. उलट हक्काने या.. छातीठोकपणे मागा.. भांडून आमच्याकडून घ्या. हा अधिकार दाखवा.. आता राजकारणावर बहिष्कार टाकणं हे वाईट होईल. विचार करून मतदान करा..'

'मला 5 वर्ष नसताना तुम्ही पाहिलेलं नाही.. मी गोपीनाथ मुंडे होऊ शकत नाही.. मला पंकजा मुंडेच ठेवा.' असं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. 

देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते नाशिक जागेबाबत

काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना जेव्हा नाशिकच्या जागेबाबत सवाल विचारण्यात आला होता तेव्हा ते म्हणालेले की, 'नाशिकची जागा भुजबळांना देतोय की नाही हा नाहीच.. प्रश्न हा आहे की, ती जागा शिवसेना लढेल की राष्ट्रवादी लढेल. राष्ट्रवादीला ती जागा गेली तर ते ठरवतील भुजबळ साहेबांना जागा द्यायची की नाही.. शिवसेनेला सीट गेली तर शिवसेना ठरवेल ती कोणाला द्यायची. त्यामुळे जागा भुजबळ साहेबांना द्यायची की नाही असा विषयच नाही.'

हे ही वाचा>> देवेंद्रच्या नावावर महाराष्ट्रात जागा येत नाही: पवार

'विषय हा चालला आहे की, जागा राष्ट्रवादीने लढवायची की, शिवसेनेने.. शिवसेनेचा आग्रह आहे की, आमची सीटिंग जागा आहे.. सगळ्या आमच्या सीटिंग जागा आम्हाला मिळाल्या आहेत. मग हीच एक सीटिंग जागा तुम्ही का घेता? राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की, आमचे तिथे आमदार आहेत आणि आम्हाला एकूण जागा कमी मिळतायेत.. त्यामुळे आम्हाला ही एक जागा किमान मिळाली पाहिजे.' 

'दोघांचं म्हणणं त्यांच्या लेखी बरोबर आहे. त्यातून आम्ही मधला मार्ग काढू.. आमचेही कार्यकर्ते आले होते माझ्याकडे त्यांनीही नाशिकसाठी आग्रह धरला होता. पण मी त्यांना समजून सांगितलं.. आपण युतीत असलो की, त्यांची मदत आपल्याला होते आपली मदत त्यांना होते. त्यामुळे मागणी करणं योग्य आहे पण निर्णय होईल त्याप्रमाणे केलं पाहिजे.' 

'भुजबळ साहेबांना तिकीट द्यायचं की नाही याचा भाजपशी संबंध नाही. राष्ट्रवादीने ते ठरवायचं आहे. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत. राष्ट्रवादीने त्यांना तिकीट दिलं तर भाजप पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठिशी उभी राहील. भाजपला काय हवंय हा विषयच नाही.. भाजपला महायुतीचा खासदार हवा आहे.' असं फडणवीस त्यावेळी म्हणाले होते. 

मात्र, आता पंकजा मुंडेंनी थेट प्रीतम मुंडेंना नाशिकमधून उभं करू असं विधान केल्याने नाशिकचा पेच अद्यापही कायमच असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
 

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT