Sharad Pawar: 'देवेंद्रच्या नावावर महाराष्ट्रात जागा येत नाही', पवारांनी डिवचलं!

मुंबई तक

ADVERTISEMENT

'देवेंद्रच्या नावावर महाराष्ट्रात जागा येत नाही'
'देवेंद्रच्या नावावर महाराष्ट्रात जागा येत नाही'
social share
google news

Lok Sabha Election 2024: मुंबई: 'शरद पवारांच्या राजकारणाचं पर्व (Era) संपलं आहे.' असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी 2019 विधानसभा निवडणुकीआधी केलं होतं. तेव्हापासूनच फडणवीस विरुद्ध पवार अशी थेट लढत महाराष्ट्रात सुरू झाली होती. त्याचवेळी 2019 मध्ये शरद पवारांनी अत्यंत आक्रमकपणे प्रचार करत आपल्या पक्षाच्या 50 हून अधिक जागा निवडून आणल्या होत्या. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी फडणवीस आणि भाजपला दूर सारून राज्यात त्यांची सत्ता आणली होती. असं असताना आता पुन्हा एकदा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीसांना डिवचलं आहे. (lok sabha election 2024 mp are not elected in maharashtra on devendra fadnavis name sharad pawar taunts again)

मुंबई Tak ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत असा दावा केला की, 'महाराष्ट्रात नरेंद्र मोदी यांच्या नावाने काही जागा मिळत असतील असं वाटत नाही...' 

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

मुंबई Tak च्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत शरद पवार यांना असा प्रश्न विचारण्यात आला की, 'तुम्ही भाजप आणि शिवसेनेची जी युती होती ती तोडली.. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केलं.. तेव्हा शिवसेनेला मोदी-फडणवीसांच्या नावाने मतं त्यांना दिली होती.. पण निवडणुकीनंतर युती तोडली.. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

शरद पवार: ते 25 वर्ष एकत्र होते.. त्यावेळी काही ते मोदी आणि अमित शाह यांच्या नावाने निवडणूक लढवत नव्हते. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने निवडणूक लढवत होते. त्यांना ज्या जागा मिळत होत्या त्या बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने मिळत होत्या. 

मला नाही वाटत की.. नरेंद्र मोदींच्या नावाने जागा मिळत असू शकतील.. पण देवेंद्रच्या नावाने मिळतात असं वाटत नाही. पण मोदींमुळे विजय मिळाला ही गोष्ट मान्यच आहे. पण याचा अर्थ शिवसेना अशी काही तरी संघटना नव्हती. की, तिला कोणी काही महत्त्व देऊ नये. 

हे ही वाचा>> हेमंत गोडसेंची पुन्हा वाढली चिंता; महायुतीत 'नाशिक'वरून नवा ट्विस्ट!

शिवसेना ही प्रचंड कार्यकर्त्यांच संच असलेल्या लोकांचं संघटन होतं. मी तर हेही सांगतो की, महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंनी जी संघटना निर्माण केली त्या संघटनेने समाजातील लहान-लहान घटकांना जो आत्मविश्वास दिला.. किंबहुना मी सुद्धा देऊ शकलो नाही.

ADVERTISEMENT

आता उद्या माझी औरंगाबदला सभा आहे. त्यांचे कोण उमेदवार आहेत.. चंद्रकांत खैरे.. खैरे कोणत्या समाजाचे आहेत.. तर सुतार.. सुतार समाजाची किती मतं असतील तिथे? जास्तीत जास्त तीन हजार.. चार हजार.. तर ते तीन वेळेला आमदार, चार वेळेला खासदार होऊ शकले. 

ADVERTISEMENT

ज्याच्याकडे 3-4 हजार कौटुंबिक मतं नाहीत ती व्यक्ती इतक्या वेळा येऊ शकते याचा अर्थ बाळासाहेब ठाकरे त्यांच्या पाठिशी उभे होते आणि अशा लहान थरातील लोकांना सुद्धा बाळासाहेबांनी मोठं केलं. हे अमित शाह किंवा मोदींनी असं केलेलं नाही.

हे ही वाचा>> Eknath Shinde: 'तोंड दाखवायला जागा राहणार नाही, सगळंच बाहेर काढेन', शिंदेंचा ठाकरेंना इशारा

असं उत्तर शरद पवार यांनी दिलं. आपल्या याच उत्तरातून त्यांनी देवेंद्र फडणवीसांना देखील डिवचण्याचा प्रयत्न केला. यामुळे आता शरद पवार यांच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT