ठाणे: पहाटे घर सोडल्यानंतर तिघींचा नाही पत्ता; 3 दिवसांपासून बेपत्ता... ठाणे पोलिसांचं पथक लखनऊला रवाना

मुंबई तक

कल्याणच्या खडकपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बारावे गावातील रहिवासी असलेल्या दोन सख्ख्या बहिणी आणि त्यांची 13 वर्षीय भाजी सोमवारी सकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर, त्या तिघींचा काहीच पत्ता लागला नाही.

ADVERTISEMENT

पहाटे घर सोडल्यानंतर तिघींचा नाही पत्ता;
पहाटे घर सोडल्यानंतर तिघींचा नाही पत्ता;
social share
google news

बातम्या हायलाइट

point

पहाटे घर सोडल्यानंतर तिघींचा नाही पत्ता

point

3 दिवसांपासून तिघीही बेपत्ता...

point

ठाणे पोलिसांचं पथक लखनऊला रवाना

Thane Crime: ठाण्यातून तीन अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्याचं प्रकरण उघडकीस आलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, कल्याणच्या खडकपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बारावे गावातील रहिवासी असलेल्या दोन सख्ख्या बहिणी आणि त्यांची 13 वर्षीय भाजी सोमवारी सकाळच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या होत्या. त्यानंतर, त्या तिघींचा काहीच पत्ता लागला नाही. दोघी बहिणींपैकी एक 13 वर्षीय तर दुसरीचं वय 14 वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे. 

सोमवारी पहाटे घरातून बाहेर पडल्या अन्... 

मिळालेल्या माहितीनुसार, या तिन्ही मुली सोमवारी जवळपास 5.30 वाजताच्या सुमारास घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या घरी परतल्याच नाहीत.कुटुंबियांनी आजूबाजूच्या परिसरात त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तसेच,  नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडेही चौकशी केली, पण कोणतीही माहिती मिळाली नाही. बराच वेळ त्या तिघींचा काहीच पत्ता न लागल्याने कुटुंबियांनी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये मुली बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. 

हे ही वाचा: उज्ज्वल निकमांचा गेम चेंजिंग युक्तीवाद, किसनराव हुंडीवाले प्रकरणात 10 जणांना जन्मठेप, भाजप नेत्याचं कुटुंब होतं सामील

लखनऊला पोलीस पथक पाठवण्यात आलं 

प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि तिघींचा शोध घेण्यास सुरूवात केली. यासंदर्भातील महत्त्वाच्या माहितीच्या आधारे, त्या मुली उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये असण्याची शक्यता असल्याचं पोलिसांना कळलं. ही माहिती मिळाल्यानंतर, लखनऊला एक विशेष पोलिस पथक पाठवण्यात आले आहे, जे स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुलींचा शोध घेत आहे. 

हे ही वाचा: राज ठाकरेंनी मुभा दिली म्हणूनच KDMC मध्ये महायुतीला पाठिंबा, मनसेच्या माजी आमदाराने सगळं सांगितलं

पोलिसांचं आवाहन 

पोलिसांनी या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, घरातून अचानक बेपत्ता झालेल्या मुली अल्पवयीन असून त्यांचा शोध घेण्यासाठी सर्व बाजूंनी तपास केला जात आहे. तसेच, जर कोणाला या तीन अल्पवयीन मुलींबद्दल काही माहिती मिळाली तर त्यांनी तात्काळ जवळच्या पोलिस ठाण्यात कळवावे, असं पोलिसांनी सर्वसामान्य जनतेला आवाहन केलं आहे. 

हे वाचलं का?

    follow whatsapp