‘माझे मेंटॉर, माझे टिचर....’ ,जितेंद्र आव्हाडांना ललकारणाऱ्या सहर शेखची ‘ती’ जुनी पोस्ट व्हायरल
Sahar Shaikh old Facebook Post about Jitendra Awhad : या व्हायरल पोस्टमध्ये सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख “माझे मेंटॉर, माझे शिक्षक” असा केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. सध्याच्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट समोर आल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे सहर शेख यांनी निवडणुकीनंतरच्या भाषणात जितेंद्र आव्हाड यांच्यावर थेट टीका केली असताना, दुसरीकडे याच आव्हाडांसाठी केलेली ही भावनिक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. काही नेटकरी जितेंद्र आव्हाडांमुळेच सहर इथवर पोहोचली, असा दावा करत आहेत.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
‘माझे मेंटॉर, माझे टिचर....’ ,जितेंद्र आव्हाडांना ललकारणाऱ्या सहर शेखची ‘ती’ पोस्ट व्हायरल
Sahar Shaikh old Facebook Post about Jitendra Awhad : ठाणे महानगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मुंब्रा परिसरातील प्रभाग क्रमांक 30 संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणारा ठरला. या प्रभागातून AIMIM कडून निवडणूक लढवणाऱ्या सहर शेख यांनी दणदणीत विजय मिळवत राजकारणात जोरदार एन्ट्री केली. विशेष म्हणजे, या विजयासोबतच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करत केलेलं भाषण चांगलंच गाजलं. या भाषणामुळे सहर शेख या नावाची राज्यभर चर्चा सुरू झाली. मात्र, या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये आता सहर शेख यांची एक जुनी फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फेसबुक पोस्टची 'मुंबई Tak' पुष्टी करत नाही.
या व्हायरल पोस्टमध्ये सहर शेख यांनी जितेंद्र आव्हाड यांचा उल्लेख “माझे मेंटॉर, माझे शिक्षक” असा केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. सध्याच्या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही पोस्ट समोर आल्यानं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे सहर शेख यांनी निवडणुकीनंतरच्या भाषणात जितेंद्र आव्हाड यांच्यावर थेट टीका केली असताना, दुसरीकडे याच आव्हाडांसाठी केलेली ही भावनिक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली आहे. काही नेटकरी जितेंद्र आव्हाडांमुळेच सहर इथवर पोहोचली, असा दावा करत आहेत.
सहर शेखने फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलंय?
“माझ्या आवडत्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. माझे मार्गदर्शक, माझे शिक्षक. कामाप्रती तुमची निष्ठा मला माझ्या क्षमतेपेक्षा जास्त काहीतरी करण्यास प्रेरित करते. अल्लाह तुम्हाला उत्तम आरोग्य, आनंद आणि भरपूर यश देवो,” असा मजकूर सहर शेख यांनी त्यांच्या जुन्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिला आहे. सध्या ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे.
दरम्यान, ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 30 मध्ये AIMIM ला अभूतपूर्व यश मिळालं आहे. या प्रभागातून AIMIM चे नफिस अन्सारी, सहर युनुस शेख, शेख सुलताना अब्दुल मन्नान आणि डोंगरे शोएब फरिक असे चार उमेदवार विजयी झाले. संपूर्ण प्रभागाने AIMIM ला पसंती दिल्यामुळे मुंब्रा परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचं स्पष्ट चित्र दिसत आहे. ठाणे महानगरपालिकेत AIMIM चे एकूण पाच उमेदवार विजयी झाले असून, मुंब्र्यात पक्षाचा आवाज अधिक बुलंद झाला आहे.










