Lok Sabha 2024 : बारामतीत सुप्रिया सुळेंना आघाडी, पाहा ओपिनियन पोल
lok Sabha election Maharashtra Live updates : महाराष्ट्रातील सर्व घटना घडामोडींचे अपडेट्स आणि माहिती वाचा मुंबई Tak लाईव्ह ब्लॉगमध्ये
ADVERTISEMENT
Lok Sabha Election 2024 Maharashtra Live News : महाराष्ट्रातील तापमानाचा पारा वाढत चालला आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरणही चांगलेच तापले आहे. दररोज महाराष्ट्रातील राजकीय गणितं बदलत असून, यासंदर्भातील ताजे अपडेट्स वाचा...
ADVERTISEMENT
पाहा ओपिनियन पोल..
ADVERTISEMENT
- 10:33 AM • 17 Apr 2024
अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार जाहीर!
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा 82 व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित पुरस्कार सोहळा 24 एप्रिल रोजी पार पडणार आहे. दीनानाथ नाट्यग्रह येथे हा सोहळा पार पडणार आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृति प्रतिष्ठान ही विश्वस्त संस्था गेली 34 वर्षे पुणे येथे कार्यरत आहे. ही संस्था मंगेशकर कुटुंबियांनीच स्थापन केली असून त्यांचा मुळ उद्देश हा दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा स्मृतिदिन (दि.24) एप्रिल रोजी प्रतिवर्ष साजरा करणे हा आहे. मंगेशकर प्रतिष्ठान तर्फे दरवर्षी संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, पत्रकारीता व सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो व त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच अशा व्यक्तीला दिला जातो की ज्याने आपल्या राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय योगदान दिले आहे. यावर्षीचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' हा पुरस्कार लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेते पद्मविभूषण अमिताभ बच्चन यांना प्रदान केला जाणार आहे. हा पुरस्कार स्विकारण्यासाठी ते स्वत: उपस्थित राहणार आहेत.
- 09:55 PM • 16 Apr 2024
एबीपी सी-व्होटरच्या ओपिनियन पोलनुसार, बारामतीत सुप्रिया सुळेंना आघाडी तर सुनेत्रा पवार पिछाडीवर
एबीपी सी-व्होटरने महाराष्ट्राचा ओपिनियन पोल जारी केला आहे. ज्यामध्ये बारामतीत अजित पवार यांना मोठा धक्का बसेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पोलनुसार, बारातमतीत सुप्रिया सुळेंना यांना आघाडी मिळेल तर सुनेत्रा पवार या मात्र पिछाडीवर राहतील. तसेच पोलनुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला लोकसभा निवडणूक 2024 मध्ये एकही जागा मिळणार नाही असाही अंदाज वर्तवला आहे.
- 05:04 PM • 16 Apr 2024
एकनाथ शिंदेंनी घेतली सलमान खानची भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (१६ एप्रिल) दुपारी अभिनेता सलमान खान याची भेट घेतली. वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जाऊन शिंदे यांनी चर्चा केली.
१४ एप्रिल रोजी सलमान खानच्या घराच्या दिशेने गोळीबार करण्यात आला होता. यात पाच राऊंड फायर करण्यात आले होते. या प्रकरणात मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गुजरातमधील भूज येथून दोन आरोपींना अटक केली आहे.
- 01:19 PM • 16 Apr 2024
कुठे बंडखोरी होत असेल तर...', सांगलीच्या जागेवरून उद्धव ठाकरे काय म्हणाले?
'मशालीच्या चिन्हावर अंधेरीची पोटनिवडणुक आम्ही जिंकलो. मशालीचं तेज आणि आग राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचेल. येणाऱ्या निवडणुकीतही आम्ही विजयी होणार. मविआच्या संयुक्त सभाही लवकरच सुरू होतील. मविआचा जाहीरनामा अंतिम टप्प्यात आहे. स्वातंत्र्यपूर्वीपासून भाजप आणि मुस्लिम लीगचे जुने संबंध आहेत. मोदींना कदाचित मुस्लिम लीगसोबतचे जुने संबंध आठवले असतील. निवडणूक रोखे घोटाळ्यांमध्ये भाजपचं बिंग फुटलं. सुप्रीम कोर्टामुळे हा सर्व प्रकार समोर आला आहे. मविआ राज्यात 48 जागा जिंकणार. 45 प्लस हा भाजपचा संपूर्ण देशभरातील आकडा आहे.' तसंच, सांगलीतील विशाल पाटलांच्या अपक्ष उमेदवारीबाबत प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले, 'जागावाटप झालंय, मविआने अधिकृतपणे जागावाटप जाहीर केलंय. कुठे बंडखोरी होत असेल तर त्या पक्षाने ती रोखली पाहिजे.'
- 12:56 PM • 16 Apr 2024
Lok Sabha election 2024 : शिवसेनेचा प्रचार, प्रकाश आंबेडकरांचा आयोगाला सवाल
शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीचा प्रचार केला जात आहे. जाहिराती आणि बॅनर, पोस्टर्सद्वारे प्रचार केला जात असून, एका एसटी महामंडळाच्या बसवर लावण्यात आलेल्या बॅनरबद्दल प्रकाश आंबेडकर यांनी आक्षेप घेतला आहे. सार्वजनिक मालकीच्या वाहनावर याला परवानगी कशी आहे? असा सवाल आंबेडकर यांनी केला आहे.
- 12:45 PM • 16 Apr 2024
Lok Sabha : "शरद पवारांनी नैतिकता सांगू नये", तिकीट मिळताच उदयनराजेंनी थोपटले दंड
सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. तिकीट मिळाल्याचा आनंद व्यक्त करत असताना उदयनराजे भोसले यांनी 18 तारखेला मोठ्या ताकतीने उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले.
यावेळी त्यांनी शरद पवारांनी केलेल्या आरोपांचं खंडन केले. त्याचबरोबर पवारांवर पलटवार केला. ते म्हणाले, 'पवारांनी ज्यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यांनी केलेला कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचारावर पवारांनी कालच्या पत्रकार परिषदेमध्ये का सांगितले नाही? शरद पवारांनी नैतिकता सांगू नये", असे उदयनराजे भोसले म्हणाले.
"जर माझ्यावर एखाद्या भ्रष्टाचाराचा आरोप दाखवला, तर मी 18 तारखेला फॉर्म भरणार नाही आणि जर फॉर्म काढून घेण्याच्या तारखे अगोदर जर भ्रष्टाचार दाखवला तर त्या वेळेपर्यंत मी फॉर्म काढून घेईल", असे आव्हान उदयनराजे यांनी पवारांना दिले आहे.
- 10:14 AM • 16 Apr 2024
Kolhapur Lok Sabha : शाहू महाराज छत्रपती आज भरणार अर्ज
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती मंगळवारी (दि. 16 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. ऐतिहासिक दसरा चौकातून शक्ती प्रदर्शन रॅलीला सुरुवात होणार असून, दसरा चौक व्हीनर्स कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत रॅली काढली जाणार आहे.
- 10:09 AM • 16 Apr 2024
Baramati Lok Sabha : अजित पवार बारामतीत डमी उमेदवार?
महाराष्ट्रातील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांकडून सावधपणे पावलं टाकली जात आहेत. कारण सुनेत्रा पवार यांची उमेदवारी म्हणून घोषणा करण्यात आल्यानंतर अजित पवारांनी आणखी एक अर्ज विकत घेतला आहे. हा अर्ज अजित पवार यांच्या नावाने घेण्यात आला आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण, अजित पवारांकडून आणखी एक अर्ज खरेदी करण्यात आला आहे.
त्यामुळे अजित पवार डमी उमेदवार म्हणून कुणाला रिंगणात उतरवणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे. सुनेत्रा पवार यांचा अर्ज छाननीमध्ये कुठल्या कारणाने बाद झाला, तर पर्यायी उमेदवार म्हणून पार्थ पवार यांना उमेदवारी दिली जाऊ शकते किंवा अजित पवारही डमी उमेदवार असू शकतात, असे म्हटले जात आहे.
रामटेकमध्ये काँग्रेसच्या उमेदवारी रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. काँग्रेसने पर्यायी उमेदवार दिलेला असल्याने श्यामकुमार बर्वे हे आता काँग्रेसचे उमेदवार आहेत. तसे काही घडले, तर पर्याय म्हणून अजित पवारांकडून ही सावधगिरी बाळगली जाणार असल्याचे म्हटले जात आहे.
- 09:37 AM • 16 Apr 2024
जानकरांना फडणवीसांकडून आमदारकीची ऑफर
माढा लोकसभा मतदारसंघात पक्षाला मोठा झटका बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माढ्यात लक्ष घातले आहे. त्याचाच भाग म्हणून माळशिरस आणि सोलापूर जिल्ह्यात धनगर समाजातील महत्त्वाचे नेते उत्तमराव जानकर यांना महायुतीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
उत्तमराव जानकर यांना फडणवीसांनी नागपूरला बोलावून घेतले. त्यांना आमदारकीची ऑफरही दिली आहे. पण, असं असलं तरी जानकरांनी भाजपला दिलासा दिलेला नाही. त्यांनी भूमिका मांडण्यास वेळ घेतला आहे.
19 एप्रिल रोजी उत्तमराव जानकर हे भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे ते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठीही हजर राहणार नाहीत. मोहिते पाटलांनी पवारांसोबत परतण्याचा निर्णय घेतल्यानंतर माढ्यातील समीकरणे पूर्णपणे बदलून गेली असून, त्याचा माढा आणि सोलापूर या दोन मतदारसंघावर थेट परिणाम होताना दिसत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर उत्तम जानकर काय म्हणाले... पहा व्हिडीओ
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT