Lok Sabha Election 2024: 'हे लोकं महिन्याभरात भयंकर घटना घडविण्याच्या..', PM मोदींचा खळबळ उडवून देणारा आरोप

मुंबई तक

ADVERTISEMENT

PM मोदींचा खळबळ उडवून देणारा आरोप
PM मोदींचा खळबळ उडवून देणारा आरोप
social share
google news

PM Modi on Constitution: सातारा: भाजप तिसऱ्यांदा बहुमताने निवडून आलं तर ते संविधानच बदलून टाकतील असा आरोप विरोधक हे प्रचार सभांमधून करत आहेत. आता तशाच स्वरूपाचा आरोप स्वत: पंतप्रधान मोदी हे विरोधक आणि विशेषत: काँग्रेसवर करत आहेत. पण याचवेळी पंतप्रधान मोदींनी एक खळबळ उडवून देणारा आरोप विरोधकांवर केला आहे. (lok sabha election 2024 opponents intend to create something terrible in the country within a month pm modi sensational allegation satara sabha)

'येत्या एका महिन्याच्या आत देशात काही मोठी घटना घडविण्याचा यांचा इरादा आहे. मी त्यांच्यावर अत्यंत गंभीरपणे एक आरोप त्यांच्यावर लावणार आहे.. सामाजिक तणाव निर्माण करून वाईट घटना घडावी याचे खेळ खेळले जात आहेत.' असा गंभीर आरोप मोदींनी साताऱ्यातील जाहीर सभेत केला आहे.. 

पाहा साताऱ्याच्या सभेत पंतप्रधान मोदी काय म्हणाले...

'काँग्रेस संविधान बदलून हाच फॉर्म्युला...' 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

'हे काय खेळ करत आहेत हे तुम्हाला समजलं तर तुम्हालाही धक्का बसेल. भारताचं संविधान हे धर्माच्या आधारावर आरक्षणाला मान्यता देत नाही. बाबासाहेब आंबेडकर यांची देखील धर्माच्या आधारावर आरक्षणाला मान्यता नव्हती.'

हे ही वाचा>> 'ब्लेम गेम कशाला खेळता?', उदयनराजे भडकले..

'कर्नाटकात काँग्रेसने काय केलं.. ओबीसींना जे 27 टक्के आरक्षण मिळालं आहे. त्यांनी एका रात्रीत सर्व मुसलमानांना ओबीसी घोषित केलं. एक फतवा काढला. ओबीसीच्या हक्काचं जे आरक्षण होतं त्यावर डाका टाकला आणि अधिकचं त्यांना देऊन टाकलं. काँग्रेस संविधान बदलून हाच फॉर्म्युला संपूर्ण देशात लागू करू इच्छिते. पण काँग्रेस आणि इंडिया आघाडीवाल्यांनी कान खोलून ऐका.. जोपर्यंत मोदी जिवंत आहे.. धर्माच्या आधारावर आरक्षण आणण्याचा आपला प्रयत्न, संविधान बदलण्याचा प्रयत्न हा मी जिवंत असेपर्यंत करू शकणार नाही.. हे लिहून घ्या.' असं विधान पंतप्रधान मोदींनी केलं आहे.

ADVERTISEMENT

'AI वापरून ते माझा, अमित भाईचा आवाज...'

ADVERTISEMENT

'समोरासमोर हे लोकं लढू शकत नाहीत. त्यामुळे आता सोशल मीडियावर फेक व्हिडिओ पसरवत आहेत. आमच्या पक्षातील लोकांच्या आवाजातील AI चा वापर करून कधी माझा आवाज, कधी आमच्या अमित भाईंचा आवाज.. कधी आमच्या नड्डाजींचा आवाज..' असा आरोप मोदींना केला आहे.

'जो कधी आम्ही विचारही केला नाही ती वाक्य आमच्या तोंडी घालून आग लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा बातम्यांमुळे समाजात तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.'

'एका महिन्याच्या आत देशात काही तरी मोठी घटना घडविण्याचा इरादा'

'देशात शांततेत निवडणुका सुरू राहिल्या तर यांचे मनसुबे कधीही सफल होणार नाही. यासाठी येत्या एका महिन्याच्या आत देशात काही तरी मोठी घटना घडविण्याचा यांचा इरादा आहे. मी त्यांच्यावर अत्यंत गंभीरपणे एक आरोप त्यांच्यावर लावणार आहे.. सामाजिक तणाव निर्माण करून वाईट घटना घडावी याचे खेळ खेळले जात आहेत.' असा खळबळजनक आरोपही पंतप्रधान मोदींनी केला. 

हे ही वाचा>> अजित पवारांच्या भावाचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार सुप्रिया विरोधात उभी राहते हे कधीच..'

'न बघता व्हिडिओ फॉरवर्ड करू नका, नाहीतर...'

'लोकशाहीच्या भल्यासाठी आणि देशाच्या एकतेसाठी जे काही फेक व्हिडिओ येत आहेत त्यांना एक्सपोज करा. ते फॉरवर्ड करण्यापूर्वी तुम्ही त्याबाबत एकदा विचार करा.. कायदे कडक आहेत. मला वाटत नाही की, निर्दोष नागरिक याचे शिकार व्हावेत त्यामुळे हे फेक व्हिडिओ या सगळ्यापासून वाचवणं गरजेचं आहे..' असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT