Lok Sabha Election 2024: शिवसेनेने (शिंदे गट) नाशिकची जागा गमावली?, गोडसेंचं करिअर पणाला..
Lok Sabha Election Nashik Hemant Godse: शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचे राजकीय करिअर हे सध्या धोक्यात आलं आहे. जाणून घ्या नाशिक लोकसभा मतदारसंघात नेमकं काय घडतंय.
ADVERTISEMENT

Nashik Lok Sabha: मुंबई: नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना (शिंदे गट) खासदार हेमंत गोडसे हे प्रचंड आग्रही आहेत. मात्र, त्यांचा पत्ता कट झाल्याची जोरदार चर्चा ही राजकीय वर्तुळात सुरू आहे. नाशिकची जागा ही छगन भुजबळांनी लढवावी अशी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचीच इच्छा आहे. ज्याबाबत स्वत: भुजबळांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. पण यामुळेच शिंदेंच्या शिवसेनेला नाशिकसारखा महत्त्वाचा मतदारसंघ आता गमवावा लागण्याची दाट शक्यता आहे. (lok sabha election 2024 shiv sena shinde faction lost the seat of nashik hemant godse career is at stake)
लोकसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून सर्वाच पक्षांनी आपआपल्या जागांवरील उमेदवारांची यादी जाहीर केली. पण महायुतीने अद्यापही नाशिकचा उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यातच येथील दोन टर्मचे खासदार असलेले हेमंत गोडसे हे मागील काही दिवस मुंबईतच तळ ठोकून होते. पण म्हणावा तसा प्रतिसाद त्यांना मिळालेला नाही. त्यामुळे कोणतीही घोषणा होण्याआधीच गोडसेंनी स्वत:च्या प्रचाराला सुरुवात केली आहे.
दुसरीकडे नाशिकमध्ये आपली उमेदवारी कशी ठरलीय याबाबत स्वत: छगन भुजबळ यांनीच माध्यमांना माहिती दिली आहे.
पाहा छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले:
'जी चर्चा दिल्लीमध्ये झाली तिथल्या वरिष्ठ नेत्यांसोबत सगळ्यांची आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जागांबाबत कोण उमेदवार, कोणती जागा कोणाला द्यायची या संदर्भातील जेव्हा चर्चा झाली तेव्हा अचानक त्यावेळी माझं नाव पुढे आलं. सांगितलं की, भुजबळांनी नाशिकमधून उभं राहावं. याची काही कल्पना आम्हाला सुद्धा नव्हती.'










