West Bengal exit poll : ममता बॅनर्जीना बसणार जबर धक्का! बंगालमध्ये 'खेला होबे'

मुंबई तक

West Bengal Exit Poll Result : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा 'खेला होबे'चा नारा खूप प्रसिद्ध आहे. पण लोकसभा निवडणूक 2024 च्या मैदानात ममता बॅनर्जी यांचाच खेला होबे होताना दिसतोय.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

लोकसभा निवडणूक 2024 च्या मैदानात ममता बॅनर्जी यांचाच खेला होबे होताना दिसतोय.

point

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांपैकी भाजपला 26 ते 31 जागा मिळताना दिसत आहेत.

Lok Sabha Election 2024 : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या (TMC) अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamta Banerjee) यांचा 'खेला होबे'चा नारा खूप प्रसिद्ध आहे. पण लोकसभा निवडणूक 2024 च्या मैदानात ममता बॅनर्जी यांचाच खेला होबे होताना दिसतोय. शनिवारी (1 जून) जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, बंगालमधील लोकसभेच्या 42 जागांपैकी भाजपला 26 ते 31 जागा मिळताना दिसत आहेत. त्याच वेळी, तृणमूल काँग्रेस 11 ते 14 जागांवर आणि इंडिया ब्लॉक फक्त 2 जागांपर्यंत पोहोचताना दिसत आहे. (lok sabha election 2024 west bengal exit poll 2024 mamata banerjee will get a big shock in bengal )

जर व्होट शेअरबद्दल बोलायचं झालं तर, तृणमूल काँग्रेसला 40 टक्के, भाजपला 46 टक्के, इंडिया ब्लॉकला 12 टक्के आणि इतर पक्षांना 2 टक्के मत मिळत आहे. अशा स्थितीत एक गोष्ट स्पष्ट होते की भाजपला 46 टक्क्यांच्या आसपास मताधिक्य मिळत असेल आणि त्यांच्या जागा एवढ्या वाढत असतील, तर तृणमूल काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण बंगालमध्ये भाजप चांगलीच मुसंडी मारेल. कारण दक्षिणेत कोणताही धक्का न लावता पश्चिम बंगालमध्ये भाजपला एवढा मोठा विजय मिळणे अशक्य आहे.

हेही वाचा : Exit Poll मध्ये शरद पवारांचा 'आकडा' ठरला खरा!

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यांतर्गत, 1 जून रोजी मतदान झालेल्या सर्व 9 जागा तृणमूल काँग्रेसने 2019 मध्ये आणि मोठ्या फरकाने जिंकल्या होत्या. अशा स्थितीत एक्झिट पोलनुसार एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, या 9 जागांवर भाजप तळ ठोकू शकते.

पश्चिम बंगालमधील भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, जर परिस्थिती चांगली राहिली तर पश्चिम बंगालमधून भाजपला 29 जागा मिळतील असा अंदाज आहे. बंगालमधील भाजप नेत्यांच्या म्हणण्यानुसार, बंगालमध्ये 1 जून रोजी ज्या नऊ जागांवर मतदान झाले, त्यापैकी तीन जागांवर भाजप आघाडीवर आहे. बारासात, उत्तर कोलकाता आणि मथुरापूर या जागांवर भाजप बाजी मारू शकते.

हे वाचलं का?

    follow whatsapp